Solapur News : केंद्राच्या सत्तेतील व्यापाऱ्यांची टोळी निवडणुकीत कानांना बरे वाटणाऱ्या घोषणा करते : मोहिते पाटलांचा मोदी सरकारवर घाणाघात

हा देश सर्वांचा आहे, ही जाणीव जागृती करण्यासाठी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली.
Dr. Dhavalsingh Mohite Patil
Dr. Dhavalsingh Mohite PatilSarkarnama

भोसे (जि. सोलापूर) : केंद्रात (central government) सत्तेत असलेली व्यापाऱ्यांची टोळी निवडणूक काळात कानांना बरे वाटणाऱ्या घोषणा करते. मात्र, कोणतेही भरीव काम करताना दिसत नाही, असा घाणाघात काँग्रेसचे (Congress) सोलापूर (Solapur) जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी केंद्र सरकारवर केला. (Dr. Dhavalsingh Mohite Patil strongly criticized the central government)

सोलापूर जिल्हा व मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने हुन्नूर (ता. मंगळवेढा) येथे जय भारत सत्याग्रह सभा, तसेच भोसे येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मोहिते पाटील बोलत होते. ते म्हणाले की, निवडणूक काळात पोकळ आश्वासने द्यायची, त्यानंतर जनतेच्या प्रश्नाकडे पाठ फिरवण्याचे काम सध्याचे भाजप सरकार करीत आहे. जय भारत सत्याग्रह सभेच्या माध्यमातून काँग्रेसने जनतेच्या मनातील प्रश्नांना वाचा फोडली आहे. देशात लोकशाही जिवंत ठेवायचे असेल तर सर्वांनी काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे.

Dr. Dhavalsingh Mohite Patil
Indapur Bazaar Committee: इंदापुरात राष्ट्रवादीने विजयाचे खाते उघडले : मोहोळचे आमदार यशवंत मानेंची बिनविरोध निवड

काँग्रेसच्या सत्तेच्या काळात झालेला विकास विकून देशाला कंगाल करण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे. हा देश सर्वांचा आहे, ही जाणीव जागृती करण्यासाठी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली. जनतेचा आवाज असलेल्या काँग्रेसच्या बाजूने उभे राहणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. प्रशांत साळे यांच्या रूपाने एक तरुण व धाडसी तालुकाध्यक्ष तुम्हाला मिळाला आहे. तालुक्यातील काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी या युवा पिढीला सोबत घेऊन काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

Dr. Dhavalsingh Mohite Patil
Atique Ahmed's Last Letter: अतिकने लिहिलेले शेवटचे पत्र सर्वोच्च न्यायालयाकडे पाठविले; पत्रात काही बड्या नेत्यांची नावे?

तालुकाध्यक्ष प्रशांत साळे म्हणाले की, सध्याचे सरकार हे केवळ धनदांडग्या लोकासाठी काम करत आहे. सर्वसामान्य जनतेचे या सरकारला काही घेणे देणे नाही. महागाईने देश होरपळला जात आहे. गॅस, पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल चालू असून या हुकूमशाहीतून मुक्त होण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जो लढा उभा केला आहे, त्यामध्ये सर्वांनी सामील व्हावे.

या प्रसंगी प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी, पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे आदींची भाषणे झाली. या वेळी मोहिते पाटील आणि अध्यक्ष प्रशांत साळे यांच्या हस्ते हुन्नूर माध्यमिक आश्रम शाळेतील इयत्ता दहावीच्या २० मुलीना संस्थेच्या वतीने सायकलींचे वाटप करण्यात आले.

Dr. Dhavalsingh Mohite Patil
Sambhajiraje's offer to Abhijeet Patil : संभाजीराजेंची अभिजीत पाटलांना ऑफर : ‘तुम्हाला आमदार करण्याची जबाबदारी आमची...’

या सत्याग्रह सभेसाठी जिल्हा उपाध्यक्ष अप्पासाहेब इनामदार, काँग्रेसचे निरीक्षक राहुल पाटील, मंगळवेढा तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, रवींद्र शिवशरण, महिला तालुकाध्यक्ष जयश्री कवचाळे, सुनीता अवघडे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com