Karad : बेजबाबदार सरकारमुळे राज्यातील युवकांचे भवितव्य अंधारात.. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan श्री. चव्हाण म्हणाले, कऱ्हाड दक्षिणमधील मतदारांनी जो विचार जपला आहे. त्या विचाराचे पावित्र्य दूषित होणार नाही, याची काळजी आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी घेतली आहे.
Prithviraj Chavan
Prithviraj Chavansarkarnama
Published on
Updated on

karad News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील Maharashtra प्रकल्प गुजरातला पळवत आहेत. याबाबत त्यांना कोणी विचारत नसल्याने राज्यातील युवकांचे भवितव्य अंधारात आहे. राज्यातील सरकारला याचे काही घेणे-देणे नाही, असे हे बेजबाबदार व अस्थिर सरकार असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी केली आहे.

गोळेश्वर (ता. कऱ्हाड) येथे आमदार चव्हाण व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निधीतून मंजूर विविध विकासकामांच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. खासदार पाटील अध्यक्षस्थानी होते. ॲड. उदयसिंह पाटील - उंडाळकर, शिवराज मोरे, मनोहर शिंदे, जयवंतराव जगताप, इंद्रजित चव्हाण, सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता प्रमोद चौधरी, अनिल मोहिते, जगन्नाथ मोरे, नरेंद्र नांगरे - पाटील, वैभव थोरात आदी उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले, कऱ्हाड दक्षिणमधील मतदारांनी जो विचार जपला आहे. त्या विचाराचे पावित्र्य दूषित होणार नाही, याची काळजी आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. यातून स्फूर्ती घेवून यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील - उंडाळकर यांच्यासह मी व खासदार

Prithviraj Chavan
Congress : पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, देशात परिवर्तन अटळ...

श्रीनिवास पाटील यांनी नेतृत्व करत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची जपणूक केली आहे. खासदार पाटील म्हणाले, मी आणि पृथ्वीराजबाबा हातात हात घालून काम करू. पुढील विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा साथ द्यावी.

Prithviraj Chavan
Eknath Shinde News: सीमावादावर ठराव मांडणारे एकनाथ शिंदे हे तिसरे मुख्यमंत्री, कोणते मुद्दे मांडणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com