प्रचाराच्या धामधुमीत सतेज पाटलांचा झणझणीत कोल्हापुरी मिसळवर ताव!

चंद्रकांत जाधव यांच्या अकाली जाण्याने ही पोटनिवडणूक भारतीय जनता पक्षाने कोल्हापूरकरांवर लादली आहे. आता जयश्री जाधव या आपल्या बहिणीला निवडून आणणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
Satej Patil
Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत (Kolhapur Byelection) दोन्ही बाजूंनी प्रचाराला वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aagadhi) उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव (Jayashree Jadhav) यांच्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) हे कोल्हापुरात तळ ठोकून आहेत, तर भाजप उमेदवार सत्यजित कदमांसाठी महाडिक गटाने कंबर कसली आहे. जाधव यांच्या प्रचाराच्या धामधुमीत गृहराज्यमंत्री पाटील यांनी झणझणीत कोल्हापुरी मिसळवर ताव मारला. तसेच चाय पे चर्चा करत नागरिकांशी संवाद साधला. (During Jayashree Jadhav's campaign, Satej Patil tasted Kolhapuri misal)

पालकमंत्री सतेज पाटील यांनी जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ आज (ता. २७ मार्च) सकाळी तोरस्कर चौक, मणेर मस्जिद परिसरात नागरिकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी झणझणीत कोल्हापुरी मिसळचा आस्वाद घेत या भागातील नागरिकांशी विकासात्मक कामे आणि विविध बाबींवर चर्चा केली. या वेळी सतेज पाटील म्हणाले की, चंद्रकांत जाधव यांच्या अकाली जाण्याने ही पोटनिवडणूक भारतीय जनता पक्षाने कोल्हापूरकरांवर लादली आहे. आता जयश्री जाधव या आपल्या बहिणीला निवडून आणणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपला आशीर्वाद एका बहिणाला देऊन सर्वांनी ही निवडणूक आपली आहे, असे समजून कार्यरत राहावे.

Satej Patil
'शिवसेनेच्या माजी आमदाराने आदित्य ठाकरेंचा आदेश झुगारला'

कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कायम कटिबद्ध आहोत. शहराच्या विकासाचा आराखडा आपण तयार केला असून पर्यटनदृष्ट्या शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच, या परिसरामध्ये असलेला जुना शिवाजी पूल, पंचगंगा घाट सुशोभीकरणाचा देखील आराखडा तयार करण्यात आला असून या परिसरातील नागरिकांच्या सोबत चर्चा करून लवकरच यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणाही पालकमंत्री पाटील यांनी केली.

Satej Patil
माजी सरपंचावर कोयत्याने वार; हल्लेखोरास गावकऱ्यांनी पकडले

गंगावेश ते शिवाजी पुलाकडे जाणाऱ्या आखरी रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे प्रलंबित होते. मात्र या रस्त्यासाठी देखील ५० लाखांचा निधी आपण उपलब्ध करून दिल्याचेही पालकमंत्री सतेज पाटील यांनी या वेळी सांगितले.

Satej Patil
जयंत पाटलांचे काम चार महिन्यांत मार्गी लावण्याचा गडकरींचा शब्द

जाधवांचा मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद

दरम्यान, रविवारच्या सुटीचे निमित्त साधत उमेदवार जयश्री जाधव यांनीही रंकाळा तलाव परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. कोल्हापूरचे नैसर्गिक वैभव असलेल्या रंकाळा तलावाच्या मूळ स्वरूपास कोणताही धक्का न लावता, तलावाचे संरक्षण व सुशोभिकरण करण्याचे काम पूर्ण करण्यासाठी संधी द्या, असे आवाहन जयश्री जाधव यांनी केले. रंकाळा तलावाबरोबर कोटीतीर्थ, राजाराम, कळंबा तलावाचाही विकास व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com