सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) सोलापूर (Solapur) विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय भवनासमोर साकारण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना निमंत्रण देण्याचा निर्णय स्मारक समितीच्या बैठकीत घेण्यात आला. (Chief Minister, Deputy Chief Minister will be invited to unveil the statue of Ahilya Devi Holkar in Solapur University)
सोलापूर विद्यापीठात कुलगुरू तथा स्मारक समितीच्या कार्याध्यक्षा डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समितीची बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस समितीचे सदस्य शिवाजी बंडगर, बापू हटकर, डॉ. बाबासाहेब देशमुख, शिवदास बिडगर, मोहन तथा माऊली हळणवार, सुभाष मस्के, नागेश वाघमोडे, शिवाजी कांबळे, अमोल कारंडे, शरणू हांडे, बापू मेटकरी, सोमेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ब्रांझमधील भव्य १५ फुटी पूर्णाकृती पुतळा पदमश्री पुरस्कार विजेते शिल्पकार राम सुतार यांच्याकडून तयार करून घेण्यात आल्याचे सांगितले. हा पुतळा विद्यापीठात दाखल झाल्याचेही त्यांनी यावेळी सदस्यांना सांगितले.
या बैठकीत पुतळा अनावरण कार्यक्रमासंदर्भात चर्चा झाली. सर्व सदस्यांनी एकमतानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्घाटनासाठी बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला
येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्याचा निर्णय सदस्यांनी घेतला. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्याचे या वेळी ठरविण्यात आले आहे. डॉ. अंजना लावंड या वेळी उपस्थित होत्या. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी आभार मानले.(Political Breaking News)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.