Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Eknath Shinde : 'सुधीरभाऊ, तुम्ही वेळेवर ही वाघनखं आणली'; CM शिंदेंना विधानसभेपूर्वी म्हणायचं होतं का...?

Wagh nakhe in Satara : साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांचे दर्शन व वाघनखे ठेवण्यात येणाऱ्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
Published on

Maharashtra Political News : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण निर्मिती झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत.

अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पाडून यात महायुती सरकारने आघाडी घेतली आहे. आता छत्रपती शिवरायांचे वाघनखे हे शस्त्र राज्यातील लोकांना दर्शनासाठी उपलब्ध केले आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचक विधान केले.

साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosle यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांचे दर्शन व वाघनखे ठेवण्यात येणाऱ्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कौतुक करत निवडणुकीच्या अनुषंगाने मोठे वक्तव्य केले.

राज्यात दोन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आली आहे. त्यापूर्वीच राज्यातील लोकांसाठी साताऱ्यात शिवरायांच्या वाघनखे प्रदर्शनात ठेवण्यात आलेली आहेत. वाघनखे उपलब्ध करून दिल्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. त्यामुळे सुधीरभाऊ तुम्ही वेळेवर ही वाघनखे आणली, असे सूचक विधान मुख्यमंत्री शिंदेंनी केले. त्यानंतर सारवासारव करत, वेळेवर म्हणजे वेगळा विचार करू नका, असेही ते म्हणाले.

Eknath Shinde
Udayanraje Bhosale : उदयनराजेंची विरोधकांना कळकळीची विनंती, म्हणाले, 'कृपा करून...'

मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde म्हणाले, शिवरायांनी संपवला अफजल खान आणि ही वाघनखे म्हणजे महाराष्ट्राची शान! या वाघनखांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि वीरतेचे दर्शन होईल. ही वाघनखे आपल्या मराठी भूमीत दाखल झाली आहेत. त्यासाठी सुधीर मुनगंटीवार लंडनमध्ये गेले होते. त्यांच्यामुळेच वाघनखांचे दर्शन झाले.

यावर काही लोक शंका उपस्थित करत असून ते दुर्दैवी आहे. काही लोकांना फक्त राजकारण करायचे असते आणि चागल्या कामाला गालबोट लावायचे असते. वाघनखाला गालबोट म्हणजे वीरतेचा अपमान करणे आहे, अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर केली.

शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. अफजलखान, शिवाजी महाराज यांना मारण्यासाठी आला होता. पण शिवाजी महाराज यांनी त्याचा कोथळा काढला. शिवाजी महाराज यांनी मुघलांना नेस्तनाभूत केले. हिंदवी स्वराज्य घडवणे हा शिवाजी महाराज यांचा ध्यास होता, असेही ते म्हणाले.

आपण शिव छत्रपतींच्या गनिमी काव्याची प्रेरणा घेतली आहे. त्यांची शिकवणूक आणि प्रेरणा आपण अंमलात आणली पाहिजे. आपला निर्धार पक्का असतो, तेव्हा मातीचे ढिगारे देखील पोकळ वाटतात. सरकारच्या माध्यमातून आपण जनतेच्या कल्याणाचे स्वप्न साकार करत आहोत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
Bjp News : भाजपचं ठरलं, आता विरोधकांना सुट्टी नाही...!; मुंडे, दानवेंसह 10 जणांची 'फायर ब्रँड' टीम तैनात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com