Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा साधेपणा.. कोल्हापुरी भाजी-भाकरीचा घेतला आस्वाद!

Eknath Shinde : 'हवामान बदल, जागतिक तापमान, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, भूस्खलन, समुद्राची समतल पातळी वाढ, हे आपल्या पृथ्वीतलावरचे धोके आहेत.."

Eknath Shinde : कोल्हापूर जिल्ह्यात कन्हेरी मठाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली आहे. २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान येथे लोकोत्सनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एकूण सात दिवस हा पंचमहाभूत लोकोत्सव साजरा होणार आहे. सैंद्रिय शेती व पर्यावरण पूरक शेती याचा प्रसार, प्रचार व्हावा यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या मठाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि सैंद्रिय शेतीचे महत्त्व सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री यांचा साधेपणाचा प्रत्यय यावेळी दिसून आला. या वेळी मठाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या सहकाऱ्यांसोबत या ठिकाणी कोल्हापुरी भाजी भाकरीचा आस्वाद घेतला. यावेळी मंत्री दीपक केसरकर व इतर सहकाऱ्यांसोबत त्यांनी उभे राहून, भाजी भाकरीचा आस्वाद शिंदे यांनी घेतला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "हवामान बदल, जागतिक तापमान, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, भूस्खलन, समुद्राची समतल पातळी वाढ, हे आपल्या पृथ्वीतलावरचे धोके जवळ येताना दिसतायेत. अशा परिस्थितीत निसर्गाचा समतोल साधण्यासाठी, पुढचे धोके थांबवण्यासाठी हा उपक्रम राबवणयासाठी जैविक शेती जी विषमुक्त शेती असते. ही संकल्पना इथे मांडलेली आहे.रासायनिक खतांचा वापर न करता, अशी शेती करता येते. "

Eknath Shinde
Vinayak Raut : किती वर्ष उद्धव ठाकरेंची भांडी घासणार ; राणेंचे राऊतांना सडेतोड उत्तर

"पण काही लोक म्हणातात की, सैंद्रिय शेतीची उत्पादकता कमी आहे. मात्र इथे कोल्हापूरच्या कन्हेरी मठात पाहिल्यावर कळतं की, तिथे अशा पद्धतीने मुबलक पीक आलेलं पाहिलं. म्हणजे जेवढी त्याला पानं आहेत, तेवढीच त्याला फळं आहेत. याबद्दल लोकांचा जो समज आहे की, अशा पद्धतीने शेती केल्यास उत्पादकता कमी होईल, पण इथे परिस्थिती उलट आहे. सैंद्रिय पिकांना दर पण अधिक आहे," असेही शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
Nagpur : अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरला जाणार; स्वागतासाठी जय्यत तयारी

"कोणतेही आजार नाही, रासायनिक खते नाही. नैसर्गिक खते वापरून, जनावरं आहेत, गायी-म्हशी त्याचं शेण-गोमुत्र यापासून नैसर्गिक खते तयार करतता.भाकड गायी सोडल्या जातात, इकडे आणून त्याचं पालन केलं जातं. यामध्ये मृदा संवर्धन आहे, सामूहिक शेतीची संकल्पना आहे, हे सगळं पर्यावरण पूरक आहे. यामध्ये गुंतवणूक कमी आणि उत्पादकता अधिक आहे," असेही शिंदेंनी यावेळी सुचवले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com