Udayanraje News : होऊ दे खर्च ! लोकसभेत उदयनराजेंचा सर्वाधिक तर बिचुकलेंचा किती?

Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला ९५ लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा दिली आहे. या मर्यादेतच सर्वांनी आपला खर्च दाखवला आहे.
Abhijit Bichukale, Udayanraje
Abhijit Bichukale, UdayanrajeSarkarnama

Satara Political News : सातारा लोकसभा मतदारसंघाचे मतदान तिसऱ्या टप्प्यात झाले. आता निकालाची प्रतीक्षा सर्वांना असली तरी तत्पुर्वी कुणी किती खर्च केला, याचीच चर्चा मतदारसंघात होती. आता ही आकडेवारी समोर आली असून यात भाजप उमेदवार उदयराजे भोसले यांनी सर्वाधिक तर त्याखालोखास शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदेंचा नंबर लागतो.

आतापर्यंत भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले Udaynraje Bhosale यांनी सर्वाधिक 49 लाख 57 हजार 187 रुपये तर, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी 46 लाख सात हजार 679 रुपये खर्च झाल्याचे निवडणूक आयोगाकडे दिलेल्या खर्चाच्या अहवालात नमूद केले आहे. आयोगाच्या सूचनेनुसार मतमोजणी नंतर 23 दिवसापर्यंत खर्च दाखवण्याची मुभा आहे.त्यामुळे यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आता आकडा किती होणार, हे काही दिवसांत स्पष्ट होणार असून त्याचीही साताऱ्यात उत्सुकता आहे.

सातारा लोकसभेची निवडणूक ही उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे Shashikant Shinde अशी झाली. त्यासाठी ७ मे रोजी 63.16 टक्के मतदान झाले आहे. यावेळेस दोन्ही उमेदवारांनी होऊ दे खर्च म्हणत सढळ हाताने खर्च केल्याची चर्चा आहे. निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला ९५ लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा दिली आहे. या मर्यादेतच सर्वांनी आपला खर्च दाखवला आहे. मतमोजणीच्या दिवसापर्यंत उमेदवारांनी दिलेला खर्च पहिला तर सर्वाधिक खर्च खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर शशिकांत शिंदे आहेत तर प्रशांत कदम यांनी 10 लाख 20 हजार 750 रुपये खर्च झाल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे.

Abhijit Bichukale, Udayanraje
Murlidhar Mohol Vs Ravindra Dhangekar : मतदान संपण्याआधीच पुण्यात झळकले भावी खासदाराचे बॅनर!

उमेदवारनिहाय दाखवलेला खर्च

उदयनराजे भोसले 49 लाख 57 हजार 187, शशिकांत शिंदे 46 लाख सात हजार 679, प्रशांत कदम 10 लाख 20 हजार 750, सुरेश कोरडे 5 लाख 14 हजार 294, संजय गाडे दोन लाख 49 हजार 495, तुषार विजय मोटलिंग एक लाख एक हजार 651, संजय वाघमारे 86 हजार 850, निवृत्ती शिंदे 55 हजार 620, सीमा पोतदार 47 हजार 052, सदाशिव बगल 42 हजार 182, सचिन महाजन 36 हजार 925, विश्वजित पाटील उंडाळकर 30 हजार 429, मारुती जानकर 25 हजार 645, आनंद थोरवडे 22 हजार 478, डॉ. अभिजित बिचुकले 14 हजार 600, प्रतिभा शेलार 13 हजार 650. या सर्व खर्चात सर्वात कमी खर्च हा प्रतिभा शेलार या उमेदवाराने दाखवला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Abhijit Bichukale, Udayanraje
Madhavi Lata Vs Owaisi : ओवेसींना टक्कर देणाऱ्या माधवी लतांच्या अडचणीत वाढ; मुस्लिम महिलांचा बुरखा काढला

निरीक्षकांचे मत काय?

आता मतमोजणी नंतर 23 दिवसापर्यंत उर्वरित खर्च द्यायचा आहे, त्यामुळे यामध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. उमेदवारांनी दिलेला खर्च काही असला तरी निवडणूक आयोगाच्या खर्च निरीक्षक यंत्रणेने उमेदवारनिहाय झालेल्या खर्चाचे आकडेही नोंदवलेले आहेत. त्यानुसार खासदार उदयनराजे भोसले यांचा खर्च 75 लाख 28 हजार 734 रुपये दाखवला आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांचा नेमका खर्च किती याची उत्सुकता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Abhijit Bichukale, Udayanraje
Sarkarnama Exclusive : मुरलीधर मोहोळांचा गेम करून धंगेकरांना ‘नाना’ तऱ्हेने सेफ करणारा नेता कोण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com