Sarkarnama Exclusive : मुरलीधर मोहोळांचा गेम करून धंगेकरांना ‘नाना’ तऱ्हेने सेफ करणारा नेता कोण?

Pune Lok Sabha Election 2024 : खुद्द फडणवीस यांच्यासह पक्षातील साऱ्याच बड्या नेत्यांनी या नेत्याची नाराजी दूर केल्याची चर्चा होती. मात्र, नेतृत्वाची पाठ फिरताच या नेत्याने आपल्याला हवे तसे काम केल्याचे काही माजी नगरसेवक सांगत आहेत.
Ravindra Dhangekar-Murlidhar Mohol
Ravindra Dhangekar-Murlidhar MoholSarkarnama

Pune News : पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रचंड ताकद असली तरीही; भाजप आणि मित्रपक्षाचे नेते गाफील न राहता, मते खेचण्यासाठी फिरत राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात सभा घेतली; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक बड्या नेत्यांनी पुण्यात फेऱ्या वाढवून जुने (लोकसभा निवडणूक-2019) टिकवून, ते वाढविण्याची रणनीती आखली. फडणवीसांनी पक्षातील आजी-माजी आमदार, खासदारांना ‘टार्गेट’ दिल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी महापालिकेतील 103 माजी नगरसेवकांवर बारीक लक्ष असल्याचे सांगून झटून काम करण्याची एकप्रकारे दमबाजीच केली. तरीही, भाजपमधील एका बड्या नेत्याने पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळांचे काम केले नसल्याचा सूर आहे.

गंभीर बाब म्हणजे या नेत्याने मनापासून काम तर केले नाहीच; त्यापलीकडे जाऊन आपला शब्द पाळणाऱ्या 20-22 माजी नगरसेवकांनाही मोहोळांचे (Murlidhar Mohol) काम न करण्याची ताकदी दिल्याचेही आता उघड-उघड सांगितले जात आहे. मात्र, फडणवीसांच्या राजकारणाची ‘स्टाइल’ ठाऊक असलेल्या काही माजी नगरसेवकांनी या नेत्याला न जुमानता मोहोळांसाठी झटल्याचेही लपून राहिलेले नाही. भाजपकडून (BJP) लोकसभा (Pune Loksabha) लढण्यासाठी इच्छुक असलेल्या; परंतु तिकिट मिळालेल्या या नेत्याने मोहोळांऐवजी कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनाच (Ravindra Dhangekar) ‘छुपा’ सपोर्ट केल्याचे दिसत आहे. खुद्द फडणवीस यांच्यासह पक्षातील साऱ्याच बड्या नेत्यांनी या नेत्याची नाराजी दूर केल्याची चर्चा होती. मात्र, नेतृत्वाची पाठ फिरताच या नेत्याने आपल्याला हवे तसे काम केल्याचे काही माजी नगरसेवक सांगत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ravindra Dhangekar-Murlidhar Mohol
Shirur Lok Sabha Voting : मतदानाला तासभर बाकी असताना शरद पवारांच्या आमदाराने केली कार्यकर्त्यांना ही सूचना!

महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत या नेत्याने इतर पक्षातील काही नगरसेवकांना फोडून भाजपमध्ये आणले; त्यांच्या माध्यमातून भाजपमध्ये आपला गट केला. त्यानंतर पक्षात ताकद वाढविण्याचाही प्रयत्न केला होता. पुणे शहर भाजपमधील नव्या दमाच्या काही नेत्यांनी फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) आशीर्वादाने या नेत्याचे ना महापालिकेत, ना पक्ष संघटनेत महत्त्व वाढवू दिले. त्यामुळे महापालिकेत भाजपची सत्ता असूनही या नेत्याला फार काही करता आले नव्हते. त्यावरून महापालिकेतील तेव्हाचे पदाधिकारी आणि या नेत्यांत खटकेही उडाले होते. त्यात या नेत्याने मोहोळ यांनाही सुनावले होते. त्यामुळे या दोघांचे फारसे सख्य नव्हतेच.

लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच, या नेत्याने पक्षाकडे तिकिट मागितल्याचे सांगितले जाते. मात्र, तसे न होता, पक्षांतर्गत विरोधक असलेल्या मोहोळांना पसंती मिळाल्याने तिकिट जाहीर झाल्यानंतर हा नेता नाराज झाल्याचे दिसून आले. त्यावर बड्या मंडळींनी मनधरणी करून त्यांना मोहोळांच्या प्रचारात आणले. त्यानंतर मोहोळांसाठी झटण्याचा शब्दही या नेत्याने दिला होता. पण, खरोखरीच हा नेता मोहोळांसाठी काम करणार का, असा सवाल खासगीत काही जण विचारत होते.

मोहोळांपेक्षा धंगेकरांची मैत्री परवडली, असे समीकरण मांडून या नेत्याने धंगेकरांना छुपी मोठी मदत केल्याचे आता भाजपमध्येच बोलले जात आहे. तसेही या नेत्याची धंगेकरांसोबतची जवळीक लपून राहिलेली नाही. महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीआधी धंगेकरांना भाजपमध्ये आणण्यासाठी याच नेत्याने फिल्डिंग लावली होती. मात्र, तेव्हाच दिवंगत नेते गिरीष बापट यांच्या विरोधामुळे धंगेकर भाजपमध्ये येऊ शकले नसल्याचे सांगितले जाते. त्यानंतरही धंगेकरांना भाजपमध्येे आणण्याचा या नेत्याचा प्रयत्न होता. कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत या नेत्याने भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना मदत न करता, तेव्हाही धंगेकरांना बळ दिल्याचे बोलले जाते.

Ravindra Dhangekar-Murlidhar Mohol
Nagar South Loksabha Constituency : श्रीगोंदे व पारनेरने वाढवली धाकधूक; नगर आणि शेवगावला लागल्या रांगा

भाजपमध्ये असलेल्या या नेत्याकडे आजघडीला 20 ते 22 माजी नगरसेवक आहेत. या मंडळींच्या प्रभागातील लोक या नेत्याला मानतात, असेही सांगितले जाते, त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या पुढाकाराने भाजपमध्ये आलेल्या आणि तेव्हा नगरसेवक झालेल्या सगळ्यांना या निवडणुकीत मोहोळांसाठी फार धावपळ न करण्याचा सल्ला गेला होता, असे काही मंडळी खासगीत सांगतात. तर काही नेत्याला तोंडावर विरोध केल्याचेही एका माजी नगरसेवकाने ‘सरकारनामा’ला सांगितले. ‘मला आमदार व्हायचे आहे. मी फडणवीसांच्या आदेशानुसार भाजपचे काम करणार असल्याचे या माजी नगरसेवकाने नेत्याला सांगून टाकले.

पुण्यासाठी मतदान झाल्याने आता कोण जिंकणार, कोणाला किती लीड मिळणार, कोठून किती मतदान झाले, त्याची बेरीज-वजाबाकी काय असेल? याचे आडाखे बांधले जात आहेत. या निवडणुकीत कोणी कसे काम केले, केले की नाही, कोणाला काय निरोप दिले गेले, याचेही हिशेब आता जात आहेत. त्यातून भाजपमधील ‘गेम’ पुढे येत आहे. त्यामुळे निकालापर्यंत आणि निकालानंतर नेमके कोणी, कुठे आणि कसे काम केले, याचाही निकाल लागणार आहे.

Ravindra Dhangekar-Murlidhar Mohol
Shirur Lok Sabha Constituency : 'कोल्हे म्हणजे केवळ राऊंड मारणारे खासदार तर मी...' ; आढळराव पाटलांचा टोला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com