Satara Lok Sabha News: सातारा लोकसभेचा उमेदवार कोण? पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टच सांगितले

Satara Lok Sabha Election 2024: साताऱ्यातील लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीसाठी पूरक असल्याचं मानलं जातं. कारण काँग्रेसचे कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांची पूर्ण ताकद...
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

Satara Lok Sabha Election : महाविकास आघाडीकडून (MVA) राज्यभरातील लोकसभा मतदार संघात कोणत्या ठिकाणी कोण उमेदवार द्यायचा हे ठरवण्यासाठी युद्ध पातळीवर हालचाली सुरु आहेत. अशातच आता पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची आणि चर्चेत असणाऱ्या सातारच्या (Satara) जागेवर आघाडीचा उमेदवार कोण असणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या जागेवर कोण उमेदवार देणार याबाबत भाष्य केलं आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाचा (Satara Lok Sabha Constituency) उमेदवार कोण असणार, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. सातारा (Satara) लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यांच्याकडून उमेदवार ठरवण्याचे काम सुरु आहे. मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघ जातीयवादी विचाराकडे कधीही गेलेला नाही आणि आम्ही तो जावुन ही देणार नसल्याचा निर्धारही पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी जाहीर केला. महाविकास आघाडीचा उमेदवार कोणीही असला तरी आम्ही पूर्ण ताकदीने तो उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसच्या कराड (Karad) दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक आज कराड (जि.सातारा) येथे घेण्यात आली होती. या बैठकीनंतर पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना सांगलीच्या (Sangli) महाविकास आघाडीच्या जागेवरुन वाद सुरु आहेत यावर प्रतिक्रिया विचारली असता चव्हाण म्हणाले, सांगलीची जागा काँग्रेस (Congress) पक्षाला मिळावी ही तेथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आग्रही मागणी आहे. शिवसेनेही तिथे मागणी केली आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर दिल्लीत चर्चा सुरु आहेत. या चर्चांमधून योग्य तो निर्णय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीतून वंचित आघाडी (VBA) बाहेर पडल्याच्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्यावर चव्हाण म्हणाले, "वंचित आघाडीने ठराविक ठिकाणी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) विरोधातील जी मते आहेत त्याची विभागणी होवू नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरु होते. मात्र, ते यशस्वी होताना दिसत नाहीत."

Prithviraj Chavan
Mahavikas Aghadi Dispute : महाविकास आघाडीत वाद पेटला; मिरजेतील ठाकरेंच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार

सातारच्या जागेबाबत चव्हाण म्हणाले, "महाविकास आघाडीतून कोणाला उमेदवारी द्यायचा तो निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यांच्याकडून या जागेसाठी उमेदवार ठरवण्याचे काम सुरु आहे. मात्र, जातीयवादी विचाराकडे कधीही सातारा लोकसभेची जागा गेलेली नाही आणि आम्ही ती जावूनही देणार नाही. शिवाय महाविकास आघाडीचा उमेदवार कोणीही असला तरी आम्ही तो पूर्ण ताकदीने निवडुन आणणार आहोत."

Prithviraj Chavan
Udayanraje Bhosale News : उदयनराजे दिल्ली दरबारी; अमित शाह देणार का उमेदवारी....

साताऱ्यातील लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीसाठी पूरक असल्याचं मानलं जातं. कारण काँग्रेसचे कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांची पूर्ण ताकद या मतदारसंघात आघाडीच्या बाजूने आहे. अशातच भाजकडून उदयनराजे भोसलेंना (Udayanraje Bhosale) उमेदवारी देण्याबाबत महायुतीमधूनच विरोध असल्याचं बोललं जात आहे. शिवाय शरद पवारांकडे या मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांच्यासारखा खमक्या उमेदवार आहे.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com