Mahavikas Aghadi Dispute : महाविकास आघाडीत वाद पेटला; मिरजेतील ठाकरेंच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार

Sangli Lok Sabha Constituency : सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन सांगली लोकसभेची जागा काँग्रेसचीच आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
vishwajeet kadam-Uddhav Thackeray
vishwajeet kadam-Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Sangli, 21 March : सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. जागावाटपाचा तिढा कायम असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गुरुवारी (ता. 21 मार्च) मिरजेत जाहीर सभा घेत आहेत. या मेळाव्यास मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीला निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, सांगली मतदारसंघावरून सुरू असलेल्या मतभेदांमुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सांगितले.

कोल्हापूरची शिवसेनेची (Shivsena) जागा काँग्रेसला सोडल्यानंतर सांगलीची काँग्रेसची (Congress) जागा शिवसेनेला दिली असल्याचा दावा सेनेकडून केला जात आहे. त्यानुसार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा पक्षप्रवेश घेऊन त्यांची उमेदवारी शिवसेनेकडून जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्याला काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन सांगली लोकसभेची जागा काँग्रेसचीच आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

vishwajeet kadam-Uddhav Thackeray
Shirdi Lok Sabha 2024: MNS च्या एन्ट्रीने शिर्डीत 'शिवसेने'सह 'रिपाइं'ची डोकेदुखी

या मतदासंघात शिवसेनेची ताकद काय? असा सवालदेखील केला होता. वेळ पडली तर टोकाची भूमिका घेऊ, असा इशाराही आमदार कदम यांनी दिला होता. नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला येत आहे. तसे अजून काही ठरले नाही. जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. सांगलीबाबत चर्चा सुरू आहे. हा मतदारसंघ ठाकरे गटाला दिला, ही खोटी बातमी आहे. सांगलीत आमचे विशाल पाटील हे जवळपास निश्चित आहेत. सध्या त्यावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे सांगलीत काँग्रेसच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गुरुवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. एकीकडे जागावाटप झाले नसताना शिवसेनेेने प्रचाराला सुरुवात करून काँग्रेसला आव्हान दिले होते. त्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस नेते सेनेविरोधात आक्रमक होऊन सांगलीची जागा सोडणार नसल्याचा इशारा दिल्यानंतर शिवसेनेचे संभाव्य उमेदवार चंद्रहार पाटील, संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख संजय विभुते या नेत्यांनी सूर बदलला. महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल, त्याला आम्ही बांधिल राहणार असल्याचे स्पष्ट केले.

vishwajeet kadam-Uddhav Thackeray
Manoj Jarange News: 'शिंदे-फडणवीसांनी खोटं बोलून डाव साधला, आचारसंहिता संपल्यावर गाठ माझ्याशी...'

मिरजेत गुरुवारी संध्याकाळी होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्यास महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला निमंत्रण देण्यात आले आहे. सांगली काँग्रेसच्या हक्काची जागा असताना शिवसेनेकडून करण्यात आलेल्या कोंडीमुळे जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये त्याबाबत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे ठाकरेंच्या मेळाव्यावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

Edited By : Vijay Dudhale

R

vishwajeet kadam-Uddhav Thackeray
Loksabha Election 2024 : भाजपचा 'हा' नाराज खासदार महाविकास आघाडीच्या वाटेवर..?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com