Gram Panchayat Election: गाववाड्यातील राजकारण तापणार ? कोल्हापूर-सांगलीतील 183 ग्रामपंचायतींचं बिगुल वाजलं

Political : येत्या 6 ऑक्टोंबरपासून ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionSarkarnama
Published on
Updated on

राहुल गडकर

Kolhapur News: ऐन दिवाळीत राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2023 या दरम्यान मुदत संपणाऱ्या आणि नवनिर्मित तसेच 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवरून निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के.सूर्यकृष्णमूर्ती यांनी जाहीर केला आहे.

यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीचा देखील समावेश असून आता ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. दोन्ही जिल्ह्यातील राजकारण गट आणि ईर्षामुळे राजकीय वातावरण तापणार आहे. येत्या 6 ऑक्टोंबरपासून ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

Gram Panchayat Election
Akola Political News : आमदार देशमुख- भाजपमधील 'कोल्डवॉर'नंतर तक्रारकर्त्या सरपंचाचे 'हे' खळबळजनक आरोप

राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये जानेवारी ते डिसेंबर 2023 अखेर मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या 89 आणि सांगली जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतीचा शुक्रवार पासून धुरळा उडणार आहे.

तर 48 ग्रामपंचायतीची पोटनिवडणुक 5 नोव्हेंबरला मतदान व 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्याबाबतची नोटीस 6 ऑक्टोंबरला प्रसिद्ध केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक आघाड्यांचे अधिक वर्चस्व असते. पॅनेलद्वारे निवडणूक लढवली जाते. त्यामुळे गावागावात आणि भाऊबंदकीत टोकाची ईर्षा पाहायला मिळते. शुक्रवारपासून या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असून गाव चावडीवर फक्त निवडणुकीची चर्चा रंगणार आहे.

तर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमदार-खासदारही गावातील राजकीय गटांना छुपी रसद देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आतापासूनच आपला गट प्रबळ आणि मजबूत करण्यासाठी रस्सीखेच सुरू झाल्याचे पाहायला मिळते.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

  • नोटीस प्रसिद्धी : 6 ऑक्टोबर

  • उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ : 16 ते 20 ऑक्टोबर

  • छाननी : 23 ऑक्टोबर

  • अर्ज माघारी, उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धी व चिन्ह वाटप : 25 ऑक्टोबर

  • मतदान : 5 नोव्हेंबर

  • मतमोजणी : 6 नोव्हेंबर

  • अधिसुचना प्रसिद्धी : 9 नोव्हेंबर

Gram Panchayat Election
Maval News : महायुतीतच जुंपली ; आमदार शेळके खासदार बारणेंवर बरसले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com