Ram Satpute News: राम सातपुतेंवर भाजपश्रेष्ठींनी सोपवली मोठी जबाबदारी; गोवा, गुजरातनंतर आता कर्नाटक मोहीम

Nagthan Constituency for Karnataka Elections: भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर कार्यरत असल्याने देशभरातील युवा वर्गाशीही त्यांचा संपर्क आहे.
Ram Satpute
Ram SatputeSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे (BJP) माळशिरसचे आमदार तथा भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राम सातपुते (Ram Satpute) यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. कर्नाटकात (Karnataka) सध्या विधानसभेच्या निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरू असून राज्यातील सर्वांत मोठा समजल्या जाणाऱ्या मतदारसंघाचे निवडणूक प्रभारीपदी त्यांच्याकडे देण्यात आले आहे. गोवा, गुजरातनंतर सातपुतेंवर पक्षाने कर्नाटकची जबाबदारी दिली आहे. (Election of MLA Ram Satpute as in-charge for Nagthan constituency for Karnataka assembly elections)

कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील नागठाण या विधानसभेच्या प्रभारीपदी राम सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरून त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. नागठाण हा मतदारसंघ कर्नाटकमधील सर्वात मोठा मतदारसंघ असून त्या ठिकाणी आमदार राम सातपुते यांना पक्ष संघटनेने जबाबदारी दिली आहे.

Ram Satpute
Ajit Pawar News : अजित पवारांनी भाजपशी कुठलाही संपर्क केला नाही, बावनकुळेंनी केले स्पष्ट !

भारतीय जनता पक्षाने जबाबदारी दिल्यानंतर आमदार राम सातपुते यांनी तातडीने कर्नाटक विधानसभेच्या रणधुमाळीत सहभागी होत कामाला सुरुवात केली आहे. सातपुते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार म्हणून ओळखले जातात. भाजपचे युवा आणि आक्रमक आमदार म्हणून सातपुते यांची ओळख आहे. भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर कार्यरत असल्याने देशभरातील युवा वर्गाशीही त्यांचा संपर्क आहे, त्याच कार्याच्या बळावर त्यांना पक्षाने ही संधी दिली आहे. (Latest Maharashtra News)

Ram Satpute
Margin Loans of Sugar Mills: साखर कारखान्यांच्या 'मार्जिन लोन'चा रिमोट कंट्रोल फडणवीसांकडेच; राज्य सरकारचा 'हा' मोठा निर्णय

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी बूथ स्तरापासून ते प्रचार यंत्रणेपर्यंत प्रत्येक सूक्ष्म नियोजन करत सातपुते यांनी प्रचाराची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. त्यांना प्रभारी केलेला नागठाण हा मतदारसंघ कर्नाटकमधील सर्वात मोठा मतदारसंघ आहे, त्यामुळे प्रवास, प्रचार दौरे आणि त्यासोबतच बूथ रचना पूर्ण करणे, पन्नाप्रमुख, आणि प्रत्येक गावापर्यंतच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत सक्रिय व्हावे आणि जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी प्रयत्न करावे, असे काटेकोर नियोजन आमदार राम सातपुते जातीने लक्ष देऊन करत आहेत.

Ram Satpute
Atiq Ahmad : अतिक अहमदला भारतरत्न द्या म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याची पक्षातून हकालपट्टी; वादग्रस्त विधान भोवलं!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यांनी या अगोदर गोवा विधानसभा तसेच गुजरात विधानसभेच्या निवडणुकीतही प्रभारी म्हणून काम केले आहे. त्यांना असलेला संघटनात्मक कामांचा अनुभव आणि मागील यशस्वीपणे काम केलेल्या प्रभारी पदाची शिदोरी यामुळे त्याच पद्धतीचे नियोजन करत नागठाण विधानसभेच्या विजयाची तयारी आमदार राम सातपुते करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com