Manoj Jarange Patil : फुंकले तरी मनोज जरांगे पाटील हे उडून जातील : सोलापुरातील बैठकीत ओबीसी नेत्याचे विधान

OBC Leader Statement In Solapur : मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हे कायमस्वरुपी नाही. हा आनंद फार काळ टिकणार नाही. तरीही या जीआरमुळे पटापट कुणबी दाखले निघतील. उद्या महाविद्यायांतील प्रवेश होतील, पुढे नोकरीतही आरक्षण मिळेल. राजकीय आराक्षणही मिळेल.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 07 September : राज्य सरकारपुढे पेच निर्माण झाल्याने हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा आदेश काढण्यात आलेला आहे. कारण, मनोज जरांगे-पाटील यांना जर काही झाले असते, महाराष्ट्र सरकार पडले असते, याचे कारण जरांगे नाहीत तर त्यांचे संघटन आहे. जनता ही जरांगे-पाटलांची मोठी ताकद आहे. स्वत: जरांगे हे फुंकले तरी उडून जातील, त्यांच्याकडे कोणतीही ताकद नाही, असा दावा ओबीसी समाजाच्या बैठकीत बोलताना युवराज चुंबळकर यांनी केला आहे.

सोलापूर (Solapur) शहर आणि जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या वतीने सात रस्ता परिसरातील बिरोबा मंदिरात झालेल्या बैठकीत चुंबळकर यांनी हे विधान केले आहे. समस्त ओबीसी समाजाचे अध्यक्ष शेखर बंगाळे यांनी ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी लढा उभा करण्यासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत चुंबळकर बोलत होते.

ते म्हणाले, मराठा समाजाला (Maratha community) मिळालेले आरक्षण हे कायमस्वरुपी नाही. हा आनंद फार काळ टिकणार नाही. तरीही या जीआरमुळे पटापट कुणबी दाखले निघतील. उद्या महाविद्यायांतील प्रवेश होतील, पुढे नोकरीतही आरक्षण मिळेल. राजकीय आराक्षणही मिळेल. मात्र त्यांचा हा आनंद कायमस्वरुपी नाही. सरकारने हा अध्यादेश आनंदाने काढलेले नाही.

मराठा आरक्षण एक-दोन वर्षे टिकेल, हे कायम राहणार नाही. हा आदेश मंत्रिमंडळाने काढलेला नाही. कमिटीने काढला आहे. उपसमितीमध्ये किती मंत्री आहेत. अगदी पाच-सहा मंत्र्यांची ही समिती आहे. ही उपसमिती म्हणजे लोकशाही नाही. उद्या ते शंभर टक्के आरक्षण मागतील. कोणी कसलाही हट्ट करेल मात्र हे कायद्याच्या कसोटीवर टिकले पाहिजे. फडणवीस सरकार स्वत: पुढे होण्याऐवजी उपसमितीला पुढे करत आहे. यामुळेच ओबीसीचे आरक्षण धोक्यात आले आहे, असेही चुंबळकर यांनी स्पष्ट केले.

हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा सरकारने काढलेल्या अध्यादेशामुळे ५८ लाख मराठा कुटुंबे थेट ओबीसीमध्ये येतात. ही घुसखोरी अशीच वाढत राहिल्यास मूळ ओबीसीवर अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर कुणबी समाजासह मराठा समाजाचा स्वतंत्र प्रवर्ग तयार करावा, अशी भूमिका विविध पदाधिकाऱ्यांनी मांडली.

बैठकीत ठरलेले मुद्दे

- सर्व जातीय ओबीसींचे संघटन तयार करणे

- जीआर रद्द करण्यासाठी न्यायालयीन पातळीवर लढा उभा करणे

- आरक्षणप्रश्नावर गप्प बसणारे ओबीसी मंत्री, आमदार यांचा निषेध करणे

- जातनिहाय जनगणनेनंतर ओबीसीतील भटक्या जातींचा एसटी प्रवर्गात समाविष्ठ करण्याची मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com