Solapur Bazar Samiti : सोलापूर बाजार समितीत पुन्हा ‘अविश्वासा’चे राजकारण; सभापती मानेंविरोधात असंतुष्ट संचालकांची मोर्चेबांधणी

Dilip Mane News : नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या बैठकीला चार ते पाच संचालकांनी दांडी मारली होती, तेव्हापासूनच दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती.
Dilip Mane
Dilip ManeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 28 August : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा अविश्वासाचे राजकारण सुरू झाले आहे. पंचवार्षिक निवडणूक होऊन सभापती निवडीला चार महिने पूर्ण होण्याआधीच सभापती दिलीप माने यांना पदावरून दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या बैठकीला चार ते पाच संचालकांनी दांडी मारली होती, तेव्हापासूनच दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती. त्याला आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीने बळ मिळाले आहे, त्यामुळे मानेंवर खरोखरच अविश्वास ठराव येणार का? नुसताच फार्स ठरणार, याची उत्सुकता वाढली आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Solapur Bazar Samiti) संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे आणि राजशेखर शिवदारे यांना सोबत घेऊन निवडणूक लढवली होती. काँग्रेस नेत्यांसोबतच्या युतीला विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांनी एकत्र येऊन विरोध दर्शविला होता. देशमुख यांच्या पॅनेलने तीन जागा जिंकल्या हेात्या.

आठवडाभरापूर्वी झालेल्या बाजार समितीच्या बैठकीला सुरेश हसापुरे यांच्यासह चार ते पाच संचालकांनी दांडी मारली होती. तेव्हा त्यांनी वैयक्तिक कारण सांगितले होते. मात्र, त्या अनुपस्थितीला वेगळाच वास येऊ लागला आहे. त्यातूनच सभापती माने यांच्यावरील नाराजी पुढे आल्याचे सांगितले जात आहे. या अविश्वासाच्या राजकारणाला सभापती दिलीप माने (Dilip Mane) हे कशा प्रकारे तोंड देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान, बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या चार ते पाच संचालकांनी वेगळ्या बैठका सुरू केल्या आहेत. त्यांच्याकडून माने यांच्या नेतृत्वाबाबत तक्रारी करण्यात येत आहे. बाजार समितीच्या कामकाजात सभापती हे संचालकांना विश्वासात घेत नाहीत. हुकुमशाही पद्धतीने ते काम करत आहेत. मर्जीतील व्यक्तींची नियुक्ती करण्यात येत आहे, असा आरोप नाराज संचालकांचा आहे. आता यावर आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि पालकमंत्री जयकुमार गोरे कसा मार्ग काढतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Dilip Mane
NCP MLA News : अजितदादांच्या आमदाराला मोठा धक्का; कोर्टाने निर्णय फिरवला

बाजार समितीमधील घडामोडींवर आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांचे लक्ष असते. संचालक मंडळातील काहीजण नाराज असल्याचे पाहून दोन्ही देशमुखांनीही रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही देशमुखांनी तब्बल एक तासभर चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. एकत्र बैठक झाल्याचे मान्य करत दोन्ही देशमुखांनी सोलापूर शहर विकासासाठी एकत्र आल्याचे सांगितले. पण, बाजार समितीबाबत दोन्ही देशमुख आता कोणता डाव टाकतात, याकडे समर्थकांबरोबरच विरोधकांचे लक्ष लागले आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख यांच्या गटातील मनीष देशमुख, रामप्पा चिवडशेट्टी, अतुल गायकवाड हे तीन संचालक निवडून आले आहेत. बाजार समितीच्या बैठकीला सुरेश हसापुरे यांच्यासह त्यांचे समर्थक संचालक अनुपस्थित होते. तसेच राजशेखर शिवदारे हे ऐन वाढदिनी आलेला अविश्वास ठराव अजूनही विसरलेले नाहीत, त्यामुळे या सर्वांच्या माध्यमातून माने यांच्या विरोधात जुळवाजुळव सुरू केल्याचे दिसून येत आहे.

Dilip Mane
Power Politic's : पवार घराण्यात सगळ्या काकांना पुतण्याच दिसतो (आवडतो); राजेंद्र पवारांनी उलगडला इतिहास!

पहिली सहा महिने अविश्वास ठराव आणणे अशक्य

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची 28 एप्रिल रोजी निवडणूक झाली होती, त्यानंतर 11 मे रोजी सभापतिपदी माजी आमदार दिलीप माने यांची निवड झाली. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार निवडीनंतर पहिले सहा महिने सभापतींवरअविश्वास ठराव आणता येत नाही, त्यामुळे विरोधक सहा महिने होण्याची वाट पाहणार की नवा मार्ग निवडून अविश्वास राजकारणात रंगवणार याकडे सोलापूरचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com