Raju Shetty Criticized State Government : राज्यात सध्या भुकंपापेक्षाही गंभीर परिस्थिती आहे.जनता महागाईने त्रस्त आहे. नद्या कोरड्या पडल्या आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे.या सगळ्यावरून लक्ष हटवण्यासाठी राजकीय भूकंपाच्या वावड्या उठवल्या जात असल्याची टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली आहे. (Raju Shetty Criticized State Government)
सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल प्रलंबित आहे. या निर्णयानंतर राज्यात मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असताना राजू शेट्टी यांनी राजकीय भूकंप वगैरे बकवास असल्याची प्रतिक्रिया देत राज्यातील परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे.
राज्याच्या सत्ताधाऱ्यांवर आणि विरोधी पक्षांवर जनतेचा विश्वास राहिला नाही. राजकीय भूकंप वगैरे बकवास आहे.त्यांना जे करायचं हे त्यांचं आधीच ठरलं आहे. जनता आता कोणावरच विश्वास ठेवणार नाही,असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. (Latest News Update)
याचवेळी त्यांनी मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या घटनेवरही भाष्य करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.'महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला द्यावा हा सरकारचा प्रश्न आहे.एवढा मोठा कार्यक्रम एखाद्या बंदिस्त ठिकाणी करायला हवा होता. पण निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही गर्दी जमवली गेली. 25 लाखांचा पुरस्कारासाठी 13 कोटी खर्च केल्याची माहिती आम्ही ऐकली आहे. पण राज्य सरकारकडे पैसे नाहीत म्हणून शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलेले नाही.सरकार सगळ्याच बाबतीत राजकारण करायला लागलं आहे, असा गंभीर आरोपही राजू शेट्टींनी केला आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.