NCP Leader Threat Extortion : बार्शीचे माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादीच्या तालुकाप्रमुखास धमकी देत मागितली खंडणी

Barshi NCP News : माझा जमिनीबाबत काडीचाही संबंध नाही. मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा बार्शी तालुका प्रमुख म्हणून सध्या काम पाहत आहे.
Vishwas Barbole
Vishwas Barbole Sarkarnama
Published on
Updated on

Barshi News : बार्शीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शी तालुकाध्यक्ष विश्वास बारबोले यांच्यावर जमीन बळकाविल्याचा आरोप करत प्रकरण मिटवून घेण्यासाठी पाच लाख रुपये द्या; अन्यथा तुमच्या घरासमोर उपोषणाला बसून बदनामी करतो, अशी धमकी दिली. या प्रकरणी बार्शी पोलिसांनी एका तरुणाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. (Ex-Mayor of Barshi Vishwas Barbole was threatened and demanded extortion)

या प्रकरणी माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून शैलेश शरणप्पा मनसाखरे (रा. सोलापूर रोड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १३ ऑगस्ट रोजी दुपारी साडेपाचच्या दरम्यान घडली.

Vishwas Barbole
Maharashtra Politics : राज्यातील घडामोडींबाबत काँग्रेस हायकमांड शरद पवारांशी चर्चा करणार

माजी नगराध्यक्ष बारबोले यांनी दिलेल्या फिर्याद म्हटले आहे की, माझ्यासह माझे दोन भाऊ, दिवंगत वडिल अर्जुनराव बारबोले यांनी ५३ एकर जमीन बळकावली असा आरोप मनसाखरे याने वारंवार केला. तसेच, जमीन परत मिळावी; म्हणून त्याने तहसील कार्यालय, पोलिस ठाण्यासमोर उपोषणे केली. मात्र, त्या जमिनीशी आमचा कसलाही संबध नाही.

Vishwas Barbole
Swabhimani Will Split Fifth Time : तुपकरांची शिस्तपालन समितीकडे पाठ; स्वाभिमानी पाचव्यांदा फुटणार

दरम्यान, मला रजिस्टर पोस्टाने ३० जुलै रोजी एक पत्र आले. त्या पत्रात माझ्या घरासमोर उपोषणाला बसणार आहे, असे मनसाखरे याने कळविले होते. त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी भाचा विकास पवार याच्या समवेत मी घरी असताना मनसाखरे हा घरी आला होता. जमिनीचे प्रकरण मिटवून घेतो. पाच लाख रुपये द्या, असे म्हणून त्याने पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यास तुमच्या घरासमोर उपोषणाला बसून तुमची बदनामी करतो, अशी धमकीही दिली.

Vishwas Barbole
Another Party Leave MVA: आणखी एक पक्ष महाआघाडीची साथ सोडणार; शब्द न पाळल्याचा आरोप करत युतीसोबत जाण्याचे संकेत

माझा जमिनीबाबत काडीचाही संबंध नाही. मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा बार्शी तालुका प्रमुख म्हणून सध्या काम पाहत आहे. मला दोन दिवसांत पैसे मिळाले नाही, तर तुमच्या घरासमोर उपोषणास बसून तुमची बदनामी करतो,ख त्यापुढील होणाऱ्या परिणामास तुम्ही जबाबदार राहाल, असे मनसाखरे यांनी म्हटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com