Sangli NCP News : मिरजचे माजी महापौर 'अजितदादा गटात' येण्यास उत्सुक; प्रवेशापूर्वीच पडली ठिणगी!

Ajit Pawar News : "अद्याप प्रवेश झालेला नाही, परंतु त्यांच्याकडून प्रवेशाचा गाजावाजा..."
Sangli NCP News Ajit Pawar
Sangli NCP News Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्ह्यातील काही नेत्यांनी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मिरजेतील माजी महापौर मैनुद्दिन बागवान आणि माजी स्थायी सभापती सुरेश आवटी भेटले असले तरी त्यांचा अधिकृत पक्ष प्रवेशाबाबत अजूनही काही स्पष्टता नाही. 'पक्षप्रवेश ही साधी गोष्ट नसून, त्या लोकांची संपूर्ण पार्श्वभूमी पाहूनच निर्णय घेतला जाणार असल्याचे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग राज्यप्रमुख इद्रिस नायकवडी यांनी स्पष्ट केले. (Latest Marathi News)

Sangli NCP News Ajit Pawar
NCP Mla Disqualification case : राष्ट्रवादीची 'ती' महत्त्वाची कागदपत्रे गेली कुठे? पक्षाकडून आक्षेप नाही

नायकवडी म्हणाले, 'सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. या सरकारने घेतलेले सर्वच निर्णय हे लोकांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि दूरगामी विकास साधणारे आहेत. अजित पवार गटात प्रवेश करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक नेते भेटत आहेत. त्यामध्ये महानगरपालिकेचे माजी महापौर बागवान आणि माजी स्थायी सभापती आवटी हे भेटले. त्यांचा अद्याप प्रवेश झालेला नाही, परंतु त्यांच्याकडून राष्ट्रवादीतील प्रवेशाचा गाजवावा केला जात असल्याचे दिसून येते. पक्ष प्रवेश करणे सोपे नसते. जे अजितदादा गटात प्रवेश करणार आहेत, त्यांची संपूर्ण पार्श्वभूमीही पाहिली जाते. अशा लोकांबाबत काय निर्णय घ्यायचा, ते उपमुख्यमंत्री अजित पवार पवारच घेतील.

अजित पवार यांनी अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यापुढेही यात कोणताही खंड पडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष आहे. अजित पवार हे सर्वसामान्यांचा आणि महाराष्ट्राचा विचार करून महायुतीत सामील झाले आहेत. अल्पसंख्यांकांची प्रगती व्हावी, त्यांचा परिपूर्ण विकास व्हावा यासाठी लवकरच बार्टी, महाज्योती व सारथी या योजनांप्रमाणेच अल्पसंख्याक समाजासाठी मार्टी अर्थात मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन करणार आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून काही दिवसातच याची घोषणाही केली जाईल.

Sangli NCP News Ajit Pawar
Thackeray VS BJP : भाजप-ठाकरे राजकीय युद्धात कारसेवक बजावणार महत्त्वाची भूमिका

चिन्हासाठी सुरू असलेला वाद देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूनेच लागेल, याचा आम्हा सर्वांना विश्वास आहे. त्यांच्या सूचनेप्रमाणे पुढील कार्यवाईसाठी आम्ही सज्ज असल्याचे माजी महापौर नायकवडी यांनी सांगितले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com