NCP Mla Disqualification case : राष्ट्रवादीची 'ती' महत्त्वाची कागदपत्रे गेली कुठे? पक्षाकडून आक्षेप नाही

Jitendra Awhad : उलटतपासणीत जितेंद्र आव्हाडांची महत्त्वाची माहिती
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Mumbai NCP News :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात आज सुनावणी सुरू झाली आणि प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस एक पक्ष असताना काही कागदपत्रे गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे.

पक्षाची अंतर्गत निवडणूक झाल्यानंतर काही महत्त्वाचे पुरावे गहाळ झाल्याची कबुली शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी सुनावणीत दिली. एवढेच नाही तर यावर पक्ष म्हणून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, हे देखील त्यांनी स्पष्ट केले.

Jitendra Awhad
Rohit Pawar : ईडी चौकशीपूर्वी रोहित पवारांचा एल्गार; म्हणाले, 'सह्याद्री कणखरपणे पाठीशी असेल तर...'

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) अंतर्गत निवडणूक झाल्यानंतर याबाबतीतले पुरावे कपाटात ठेवले होते. ते गायब झाल्याची माहिती आव्हाड जबाबात दिली. दोन जबाबदार पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडल्यावर कपाट रिकामा केला. त्यावेळी कागदपत्रांमध्ये ते काय घेऊन गेले हे आम्हाला माहीत नाही. तसेच संबंधित माणसे पक्ष सोडून गेले आहेत आणि त्यांनी या पुरव्यांचे नेमके काय केले, हे देखील माहीत नाही, असे उत्तर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिले.

'सहीचा अधिकार नाही'

जितेंद्र आव्हाड यांच्या स्पष्टीकरणानंतर अजित पवार गटाकडून याचा अधिक तपशील घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.पक्ष म्हणून नेमकी काही कारवाई करण्यात आली आहे का? पत्रावर सही करण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे? कागदपत्रे मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले गेले? या सगळ्या प्रश्नांवर आव्हाड यांनी एकच उत्तर दिलं की, मला सही करण्याचा अधिकार नाही!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून कागदपत्रे गहाळ होतात आणि कोणालाच कल्पना नाही, ही खरंच खूप गंभीर बाब आहे. यामुळे पक्षाच्या अंतर्गत कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

आव्हाडांना वकिलांकडून तंबी

जितेंद्र आव्हाड यांची उलट तपासणी सुरू असताना त्यांच्यावर अजित पवार (Ajit Pawar) गटाचे वकील संतापले. वकिलांना विचारलेल्या प्रश्नांवर उलट उत्तरे देणे, कोणते प्रश्न विचारायचे आणि कोणते प्रश्न विचारायचे नाहीत, यावर आव्हाड यांनी आक्षेप घेतला होता. मात्र, त्यावर अजित पवार गटाकडून आव्हाडांना शांत बसण्यासाठी सांगण्यात आलं. प्रश्न काय विचारायचे नाहीत हे आम्हाला अध्यक्ष सांगतील. ते तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. तुम्हाला फक्त विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरे द्यायची आहे, या शब्दांत आव्हाड यांना खडसावण्यात आले.

(Edited by Avinash Chandane)

Jitendra Awhad
Shivsena Nashik convention : 'ते' रावण आणि 'हा' राम... संजय राऊत कुणाला म्हणाले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com