यड्रावकर सेनेला शिरोळमधून हद्दपार करा : शिवसेना कोट्यातील राज्यमंत्र्यांवर जिल्हाप्रमुखांचा हल्लाबोल

शिवसैनिकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जीवावर न राहता स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी सज्ज राहावे.
Muralidhar Jadhav
Muralidhar JadhavSarkarnama
Published on
Updated on

कुरुंदवाड (जि. कोल्हापूर) : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसैनिकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जीवावर न राहता स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी सज्ज राहावे. कोणत्याही परिस्थितीत राज्यमंत्री डॉ. राजेंद्र यड्रावकर (Rajendra Yadravkar) सेनेला शिरोळ तालुक्यातून हद्दपार करुन भगवा फडकवण्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन शिवसेनेचे (shivsena) कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केले. (Expel Yadravkar Sena from Shirol : Appeal of Shiv Sena District Chief)

कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड येथील नवरंग कार्यालयात आयोजित संकल्प मेळाव्यात जाधव बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी तालुकाप्रमुख वैभव उगळे होते. शिरोळ तालुका संपर्क प्रमुख राजाराम सुतार, शिवसामर्थ्य सेनेचे जिल्हाप्रमुख आण्णासाहेब बिल्लोरे, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. या वेळी जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधून जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.

Muralidhar Jadhav
सहलीवर गेलेल्या नगरसेविकेचे हृदयविकाराने निधन; भाजपच्या सत्तेच्या मोहिमेला मोठा धक्का

तालुका प्रमुख उगळे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेनेचे नेतृत्व करणारे प्रतिनिधी सध्या सभागृहात आहेत. संपूर्ण शिरोळ तालुका शिवसेनामय करण्याच्या दृष्टीने शिवसैनिकांनी आत्तापासून प्रचाराला सुरवात करून शिवसेनेचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवावेत.

Muralidhar Jadhav
उमेदवारी नाकारल्याने ३० वर्षे संचालक असलेल्या ढमढेरेंचा राष्ट्रवादीविरोधातच शड्डू!

तालुका संपर्क प्रमुख सुतार, शिवसामर्थ्य सेनेचे बिल्लोरे, उपजिल्हा प्रमुख पाटील, जिल्हा परिषद सदस्य स्वाती सासणे, तेजस्विनी रजपूत, दीपक यादव, आप्पासाहेब भोसले, प्रतीक धनवडे, माजी नगरसेवक पराग पाटील, संजय माने, माधुरी ताकारे आदींची भाषणे झाली. स्वागत व प्रास्ताविक रेखा जाधव यांनी केले. यावेळी विकास पाटील, युवराज घोरपडे,रामभाऊ माळी, पांडुरंग पवार, संतोष नरके, निलेश तवंदकर, संतोष नरके, राजु बेले, दिलीप भेंडवडे, संजय पवार, अनिकेत बेले, नजीर मखमल्ला, मिलिंद गोरे, विष्णुपंत माळी, सुहास पासोबा आदी प्रमुख उपस्थित होते. वैशाली जुगळे यांनी आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com