Thackeray Brothers Rally : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर फडणवीसांचे भाष्य : काही मंडळी आंदोलनाचा गैरफायदा घेत आहेत...

Devendra Fadnavis Statement : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर उपरोधिक टीका करत केंद्राच्या पेपरफुटीविरोधी कायद्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
Uddhav Thackeray-Raj Thackeray-Devendra Fadnavis
Uddhav Thackeray-Raj Thackeray-Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 25 July : मी येथे आनंदाचा सोहळा अनुभवत आहे. त्यांनीही कधीतरी हा सोहळा अनुभवावा, असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या मोर्चावर लगावला. केंद्र सरकारने पेपरफुटीविरोधात कडक कायदा आणला असून त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर येथे पर्यावरण दिंडीच्या समारोपानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ठाकरे बंधू मुंबईमध्ये आंदोलन करणार असल्याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, लोकशाही आणि संविधानाची चाड सर्वांनीच ठेवली पाहिजे.’’

ते पुढे म्हणाले, मी आनंदाचा सोहळा अनुभवत आहे. हा सोहळा त्यांनीही कधीतरी अनुभवावा. जी मंडळी आंदोलनाचा गैरफायदा घेतात, मी सगळ्यांबद्दल बोलत नाही; मात्र काही मंडळी तसे करताना दिसत आहेत. त्यांनाही एकदा वारीत सहभागी होण्याची संधी मिळावी. त्यामुळे त्यांच्या विचारांतील प्रदूषणही दूर होईल.

Uddhav Thackeray-Raj Thackeray-Devendra Fadnavis
Dharmendra Pradhan resignation: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर CM फडणवीसांचे पहिले ट्विट : दिल्लीला गेल्यानंतर नेमकं काय म्हणाले?

दिल्लीतील आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थी आंदोलनावर चर्चा सुरू असून आजही चर्चा झाली आहे. सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडले आहे. चर्चेतूनच मार्ग निघत असतो.

Uddhav Thackeray-Raj Thackeray-Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : अमृतावहिनींच्या ‘त्या’ विधानानंतर अवघ्या 8 तासांतच देवेंद्र फडणवीस दिल्लीत!

देशाच्या पंतप्रधानांनी पेपरफुटीविरोधात कडक कायदा केला आहे. स्पेशल कोर्ट आणि फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून अपराध्यांना जरब बसावी, यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे. त्यामुळे तरुणांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com