फडणवीस लवकरच मुख्यमंत्री होणार : सुजय विखेंच्या दाव्याने खळबळ

खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली.
Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - पारनेर येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांना जीवन उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. ( Fadnavis to become CM soon: Sujay Vikhe's claim )

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, राज्यकर्त्यांनी गोरगरीब जनतेच्या डोक्यावर हात ठेवला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर हुकूमशहा असते तर चार राज्यात भाजपला कौल मिळाला नसता. चार राज्यात जे निकाल लागल्यानंतर येणाऱ्या 2024 मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, असे चित्र आहे.

Dr. Sujay Vikhe Patil
सुजय विखे पाटील म्हणाले, जनताच ठरवेल कोणाचा कार्यक्रम होईल...

ते पुढे म्हणाले की, परस्परांचे घोटाळे झाकण्यासाठी राज्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन झाले आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रवक्ते सध्यातरी महाराष्ट्राचे मनोरंजन करत आहेत. सरकारच्या कार्यपद्धतीमुळे हे पक्ष संपतील व पुन्हा एकदा राज्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येईल, असा आशावाद खासदार विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस एकाच माळेचे मणी आहेत. आपण सर्वजण मिळून भ्रष्टाचार करून जनतेचे वीज, पाणी व इतर प्रश्नांबाबत हाल करू, आपले सरकार जाणार नाही, याची काळजी घेऊ असे त्यांना वाटते. राज्यामध्ये किती आघाड्या होऊ द्या, मात्र जिल्ह्यामध्ये समविचारी पक्षांना व घटकांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 50 वर्षांपासून आमचे कुटुंब या प्रवृत्तीच्या विरोधात असून यापुढील काळातही राहील, असेही खासदार विखे म्हणाले.

Dr. Sujay Vikhe Patil
Video: "वाईन विकली तर ते किराणा दुकान मी बंद करेल",डॉ. सुजय विखे पाटील

चार राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पानिपत झाले आहे. राज्यातील महाआघाडी सरकारमध्ये सामील असलेला घटक पक्ष काँग्रेस माझ्या दृष्टीने संपला आहे. शिवसेनेने व राष्ट्रवादीने आपले कार्य जनतेसमोर मांडावे. पारनेर तालुक्याला दुष्काळ पाचवीला पुजला आहे. देशाचे व राज्याचे ज्येष्ठ नेते असणाऱ्यांनी दोन-तीन वेळा पारनेर तालुक्याचा दौरा केला. मात्र ते काही पारनेरचा पाणी प्रश्न सोडवू शकले नाहीत. त्यांच्यावर टीका करण्याएवढा मी मोठा नाही, पण जनतेचे प्रश्न त्यांनी व त्यांच्या पक्षातल्यांनी सोडवले पाहिजेत, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार व आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता खासदार सुजय विखे पाटलांनी केली.

Dr. Sujay Vikhe Patil
...म्हणून थोरातांच्या कारखान्यात विखे होते चेअरमन

पारनेरमधील कार्यक्रमाला सभापती गणेश शेळके, सुजित झावरे, राहुल शिंदे, मारूती रेपाळे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, दिनेश बाबर, सचिन वराळ, दादाभाऊ वारे, बाळासाहेब पठारे, किरण कोकाटे, पंकज कारखिले, कैलास कोठावळे, सुभाष गांधी, संदीप मोढवे, डॉ. विनायक सोबले आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com