Solapur Farmer Self Harm : स्वातंत्र्यदिनी हसन मुश्रीफांच्या कार्यक्रमातच तरुणाचे टोकाचे पाऊल

Hasan Mushrif In Solapur : राॅकेल पिलेल्या तरुणाला प्रशासनाने प्रसंगावधान राखत रुग्णालयात केले दाखल
Hasan Musrif in Solapur
Hasan Musrif in SolapurSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : सोलापुरात ध्वजारोहणानंतर मंत्री हसन मुश्रीफांचे भाषण सुरू असताना एका तरुणाने रॉकेल पिऊन, अंगावर ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. स्वातंत्र्यदिनी घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासानाची एकच धावपळ उडाली. त्या तरुणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात येत आहेत. अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. (Latest Political News)

Hasan Musrif in Solapur
August 15 Independence Day : 2024 साठी आशीर्वाद द्या; पंतप्रधान मोदींचे आवाहन

स्वातंत्र्यदिनानिमित्त सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर त्यांचे भाषण सुरु झाले. यावेळीच एका तरुणाने रॉकेल पिऊन आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न केला. त्याने रॉकेल अंगावरही ओतून घेतले. दरम्यान मोठ्या प्रमाणात रॉकेल प्राशन केल्याने तरुणाला भोवळ आली होती. त्या तरुणास पोलिसांनी पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

Hasan Musrif in Solapur
PM Narendra Modi At Red Fort : देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदींची 'त्रिवेणी'; तरुणांना दिला मोठा संदेश

ज्ञानेश्वर पाटील असे या तरुणाचे नाव आहे. तो दक्षिण सोलापूरमधील दोड्डी गावातील शेतकरी असल्याची मोहिती आहे. त्याने घेतलेले एका बँकेचे सर्व कर्ज टप्प्याटप्प्याने फेडले आहे. तरीही त्याच्या शेतीचा सातबारा कोरा झालेला नाही. कर्ज फेडूनही शेतीवरील बोजा कायम दाखवत असून ते कमी करण्यासाठी सरकारी दरबारी हेलपाटे मारुनही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. यातूनच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. या प्रकरणी अधिक तपास करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com