Ajit Pawar Kolhapur : 'आम्ही अतिरेकी, गुंड नाही; पाच मिनिटं बोलायला वेळ द्या !' ; अजितदादांच्या सभेत काय झालं ?

Kolhapur Farmers Banner : शेतकऱ्यांनी झळकवलेल्या पोस्टरची कोल्हापुरात चर्चा
Farmers in Kolhapur
Farmers in Kolhapur Sarkarnama

Kolhapur Political News : कोल्हापूरमधील तपोवन मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा विविध कारणांनी गाजली. या वेळी त्यांनी सर्वसामान्य लोकांसह शेतकऱ्यांची कामे करण्याचा दबाव असल्याने आम्ही महायुतीत सहभागी झाल्याचे स्पष्ट केले. तसेच हैदराबादप्रमाणे कोल्हापूरमध्ये आयटी कंपन्या असल्या पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अजित पवार गटातील मंत्री विकासावर बोलत असताना शेतकऱ्यांनी झळकवलेल्या एका फलकाने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे भरसभेत या फलकाची जोरदार चर्चा झाली. (Latest Political News)

कोल्हापुरात रविवारी झालेल्या अजित पवार गटाच्या सभेला जिल्हाभरातून जवळपास ५० हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते दाखल झाले होते. मात्र, सर्वात जास्त चर्चा रंगते ती शेतकऱ्यांनी आणलेल्या एका फलकाची. या फलकावर थेट (Ajit Pawar) अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनाच उद्देशून फलकावरील मजकूर लिहिला होता. हा फलक पोलिसांनी ताब्यात घेतला असला तरी त्यावरील मजकूर मात्र लोकांच्या लक्षात राहिला. (Maharashtra Political News)

Farmers in Kolhapur
IAS in Big Tender : ९० कोटी रुपयांच्या `या` टेंडरमध्ये कोण मंत्री ? कुठच्या ‘आयएएस’ चा इंटरेस्ट ?

कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) भाषणासाठी उभे राहताच शेतकऱ्यांनी आपल्या पिशवीतून एक फलक बाहेर काढला. त्यांनी तो फलक सभा मंडपाच्या दिशेने झळकवला. 'मी काय अतिरेकी नाही, मी गावगुंड नाही. मी शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी पाच मिनिटे द्या.' असा मजकूर असलेले पोस्टर शेतकऱ्यांनी भर सभेत फडकवले. या फलकाची चर्चा सभास्थळी चांगलीच रंगली होती. दरम्यान, ही बाब लक्षात येताच पोलिसांनी हे पोस्टर ताब्यात घेतले.

Farmers in Kolhapur
MNS Political News : मावळ लोकसभेत ट्विस्ट,आता मनसेही लढणार, महायुतीला फटका बसणार का ?

एकीकडे पवार व इतर मंत्री लोकांची कामे करण्यासाठी सत्तेत सहभागी झाल्याचे सांगत असतानाच शेतकऱ्यांच्या पोस्टरमुळे चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, अजित पवारांनी 'सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी आमच्यावर दबाव होता. तो दबाव म्हणजे बहुजनांची सर्वसामान्यांची कामे करण्याचा होता. आम्ही अडीच वर्षे सरकारमध्ये होतो ते महाविकास आघाडीचे सरकार पडले. त्यावेळी आमदारांच्या कामांवर स्थगिती आली होती. ती स्थगिती उठवण्याचा दबाव होता, असे सांगून शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालो', असे पवारांनी समर्थन केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com