Maval MNS News: मावळ लोकसभेत ट्विस्ट; आता मनसेही लढणार, महायुतीला फटका बसणार का ?

Maval Lok sabha Election : मावळ लोकसभा जिंकायचीच...
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad : लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक होण्याच्या शक्यतेतून आता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात भाजप अगोदरपासून आघाडीवर आहे. या तयारीत मावळ लोकसभेत मनसेने नवा ट्विस्ट आणला आहे. कारण कधीही न लढलेली ही जागा आता त्यांनी लढायचेच ठरवले आहे. ती जिंकण्यासाठी जोमाने कामास लागण्याचा आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे.

मनसे(MNS) मावळ लढली, तर त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसेल असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. या वर्षी तीन जानेवारीला निधन झालेले चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी २०१४ ची लोकसभा मावळमधून मनसेच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून लढविली होती. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रचारासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आणले होते.

Raj Thackeray
Maval News : 'कार्यक्षम' मुख्याधिकाऱ्यांची बदली करा; आमदार सुनील शेळकेंच्या मागणीने भुवया उंचावल्या

परंतु, त्यांनी तेथील सभेत मते फिरविणारा शहरातील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा ठाकरेंनी उपस्थित केल्याने फायदा होण्याऐवजी लक्ष्मण जगतापांना (Laxman Jagtap) तोटा झाला. त्यांचा पराभव झाला होता. तेवढाच मनसेचा मावळशी संबंध होता. कारण तेथून ते कधी लढलेच नव्हते. या वेळी मात्र त्यांनी तेथून लढायचे ठरविले असून, त्यासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र, अद्याप उमेदवार ठरला नसल्याचे मनसेचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष आणि मावळ लोकसभेचे निरीक्षक सचिन चिखले यांनी `सरकारनामा`ला रविवारी सांगितले.

मावळच्या नियोजनाची मनसेची पहिली बैठक शनिवारी (ता.९) मतदारसंघाचे संघटक रणजित शिरोळे, समन्वय संघटक अमेय खोपकर आणि चिखले यांच्या अध्यक्षतेखाली वरसवली (ता. मावळ, जि. पुणे) येथे झाली. पिंपरी-चिंचवड, मावळ, पनवेल, उरण आणि कर्जत अशा सहाही विधानसभा मतदारसंघांतील प्रमुख पदाधिकारी या वेळी हजर होते.

Raj Thackeray
Sadabhau Khot News : बारामतीत जाऊन पवारांना आव्हान देणारे सदाभाऊ खोत अजितदादांच्या स्वागताला...

विधानसभेची बांधणी, कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या, पक्ष संघटना, भविष्यात होणारे मेळावे, त्याचप्रमाणे पदाधिकाऱ्यांच्या अडचणींवर शिरोळे आणि खोपकर यांनी या वेळी मार्गदर्शन केले..तसेच मावळ(Maval) लोकसभा जिंकायचीच या उद्देशाने सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा आणि इतिहास घडवा, असा आदेशही दिला. त्यासाठी घरोघरी पोहाेचा, लोकांच्या अडीअडचणी सोडवा, असे सांगण्यात आले. पुढे अशा बैठका विधानसभा मतदारसंघनिहाय घेण्याचे ठरले. अभिनेते संजय नार्वेकरांची उपस्थिती ठळकपणे जाणवली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com