Farooq Shabdi : आय एम सॉरी असदुद्दीनसाहब...म्हणत एमआयएमच्या प्रदेश कार्याध्यक्षांचा राजीनामा

Solapur News : एमआयएमचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष फारूक शाब्दी यांनी वैयक्तिक कारणांमुळे सर्व पदांचा राजीनामा देत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
Farooq Shabdi
Farooq Shabdi Sarkarnama
Published on
Updated on
  1. एमआयएमचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष फारूक शाब्दी यांनी भावनिक होत आपल्या सर्व पदांचा राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा केली.

  2. कार्यकर्त्यांना न्याय देता येणार नाही असे वाटल्याने आणि वैयक्तिक कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  3. सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडी, अंतर्गत मतभेद आणि उमेदवारीवरून नाराजी यामुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

Solapur, 28 December : ‘आय एम सॉरी...असदुद्दीन ओवैसी साहब’ असे म्हणत आणि भावनिक होत एमआएमचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष फारूक शाब्दी यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

मी माझ्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही, असे वाटल्याने मी पक्षातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. काही जागांवर चर्चा चालली होती. मी माझ्या कार्यकर्त्यांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असे फारूख शाब्दी यांनी स्पष्ट केले आहे.

ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. चर्चा तर मी भाजपमध्ये जाणार असल्याची आहे. चर्चा होत राहणार आहे. पण मी एक राजकीय नेता आहे. माझी ही ओळख एमआयएममुळे झाली आहे. एमआयएममध्ये मी इमानदारीने राहिलो. मला मतदान करणाऱ्या लोकांसाठी मला राजकीय पर्याय मिळाला तर मी त्या पक्षात जाण्याचा निर्णय नक्की घेईन.

माझ्याकडे सोलापूर आणि मुंबई महापालिकेची निवडणुकीचे एमआयएमचे काम होते. मी गेल्या सात दिवसांपासून झोपलो नाही. सोलापुरात काम करतो, रात्री गाडीने मुंबईला जातो. त्यामुळे गेली सात दिवसांपासून तणावात आहे. मला जरा विश्रांती घेऊ द्या. त्यानंतर माझा विचार होईल. मी दुसऱ्या पक्षात एमआयएमला डॅमेज करून जाणार नाही. ज्या पक्षात जाईन त्या ठिकाणी प्रामणिकपणे, निष्ठेने काम करेन. माझ्या मुस्लिम समाजासाठी जो पक्ष हिताचे काम करेल, त्या पक्षात काम करेन, असेही फारूक शाब्दी यांनी स्पष्ट केले.

Farooq Shabdi
Solapur Politic's : शिवसेनेसोबत युती होताच राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक आक्रमक; ‘पक्षासाठी ही युती आत्मघातकी ठरेल’

सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून जोरदार राजकीय घडामोड घडत आहेत. शिवसेना-भाजपची युती अस्तित्वात येण्यापूर्वीच संपुष्टात आली आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली असून दोन्ही पक्ष प्रत्येकी ५१ जागा लढवणार आहेत.

दुसरीकडे काँग्रेस पक्षाने तिकिट जाहीर केलेल्या फिरदोस पटेल आणि मनीष व्यवहारे यांनी ती उमेदवारी नाकारत दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. फिरदोस पटेल यांनी एमआएममध्ये प्रवेश केला आहे. त्या प्रवेशामुळे शाब्दी नाराज झाल्याची चर्चा आहे. तसेच, शौकात पठाण यांच्यासेाबतही त्यांचे मतभेद होते, त्यातून शाब्दी यांनी एमआयएममधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

Farooq Shabdi
Mumbai BMC election: मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना शरद पवारांची साथ! राष्ट्रवादीला मिळणार आता 'इतक्या' जागा?

Q1. फारूक शाब्दी यांनी कोणत्या पक्षातून राजीनामा दिला आहे?
त्यांनी एमआयएम (AIMIM) पक्षातून राजीनामा दिला आहे.

Q2. राजीनाम्याचे मुख्य कारण काय सांगितले आहे?
कार्यकर्त्यांना न्याय देता येणार नाही असे वाटल्याने आणि वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी राजीनामा दिला आहे.

Q3. फारूक शाब्दी कोणत्या पक्षात जाणार आहेत का?
सध्या कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Q4. त्यांच्या राजीनाम्यामागे राजकीय कारणांची चर्चा काय आहे?
उमेदवारीवरून नाराजी, अंतर्गत मतभेद आणि सोलापूर महापालिका निवडणुकीतील घडामोडी कारणीभूत असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com