Rahul Gandhi News : राहुल गांधींवर आतंकवादी कसाबसारखा गुन्हा दाखल करा, पाकिस्तानात पाठवा: भाजप आमदाराची मागणी!

Congress News : 'राहुल गांधींना पाकिस्तानात पाठवा..'
Rahul Gandhi News :
Rahul Gandhi News :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आल्यानंतर भाजप नेत व आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे यांनी राहुल गांधींना पाकीस्तानात पाठवण्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर कसाबप्रमाणे राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असेही राणे म्हणाले. ते आज एका वृत्तवाहिनीशी कोल्हापूरात बोलत होते.

Rahul Gandhi News :
Congress News : कर्नाटक विधानसभेसाठी काँग्रेसकडून १२४ जाणांची पहिली यादी जाहीर : सिद्धरमय्यांना कोलारमधून अखेर डावललेच

नितेश राणे म्हणाले, "ओबीसी समाजाबद्दल चुकीचं बोलता, मग यानंतर कायदेशीर कारवाई झाल्यानंतर भाजपच्या नावाने का बोंबलता. विदेशात जाऊन भारताची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींवर आतंकवादी कसाबप्रमाणेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. राहुल गांधींना पाकिस्तानात पाठवलं पाहिजे," अशी मागणी राणेंनी केली आहे.

Rahul Gandhi News :
Congress News : कर्नाटक विधानसभेसाठी काँग्रेसकडून १२४ जाणांची पहिली यादी जाहीर : सिद्धरमय्यांना कोलारमधून अखेर डावललेच

पुढे ते म्हणाले, 'सांगली तसेच महाराष्ट्रात लँड जिहाद सुरू आहे. बेकायदेशीर धार्मिक स्थळांची उभे केले जात आहेत. ज्यामुळे संबंधित ठिकाणावरून हिंदू धर्मीय निघून जातील, असा प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे,' असा दावाही राणेंनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.