Satara Politics : छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमच्या सभेत काही कार्यकर्त्यांनी औरंगजेबाचे छायाचित्र झळकवले होते. अशी छायाचित्रे झळकवणाऱ्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
छायाचित्र प्रकरणावर बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, औरंगजेबाने त्याच्या कारकिर्दीमध्ये लाखो हिंदू लोकांची कत्तल केली. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना मोठा उपद्रव केला. अशा औरंगजेबाचे छायाचित्र झळकवून जर त्याचे कोणी उदात्तीकरण करत असेल तर त्याचा मी निषेध करतो. अशी छायाचित्रे झळकवणाऱ्यांच्यावर ताबडतोब देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी मी महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करतो.
महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या जुलमी कारकिर्दीच्या विरोधात मोठा लढा उभारला होता, असे असताना एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी असे औरंगजेबाचे छायाचित्र झळकवणे हे योग्य नाही. ज्यांनी असे प्रकार केले असतील त्यांनी महाराष्ट्र सोडून इतरत्र निघून जावे. महाराष्ट्राची परंपरा ही पुरोगामी सर्वधर्म समभावाची आहे. तिथे असे प्रकार होणार असतील, तर हे बिलकुल खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला
दरम्यान, दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार संजय शिससाट यांनी तर थेट छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर झाल्याने याचे सर्वात जास्त दु:ख हैदराबादींना झाले आहे. त्यामुळे ते लोकं उपोषणाच्या नावाखाली शहराला वेठीस धरत आहे. शहराचे नाव बदलणे म्हणजे अत्याचारी औरंगजेबाविरोधातील हा लढा आहे. त्याचं वाईट वाटायचं काय कारण, असा सवालही शिरसाटांनी केला आहे.
तसेच, तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात का? असा सवाल त्यांनी केला आहे. उपस्थित केला. औरंगजेबाच्या कबरेचे अवशेष आमच्या इथं नको.ही कबर काढून घ्यावी, अशी मागणी आपण पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.