नगर: महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या सुवेंद्र गांधी, दिप्ती गांधी यांच्यासह तीन उमेदवारांचे अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वैध ठरविले आहेत. त्यामुळे भाजपने जल्लोष केला. उमेदवारांनी विशाल गणपती मंदिरात जावून पूजा करून आनंद व्यक्त केला.
महापालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुवेंद्र गांधी, दीप्ती गांधी, सुरेश खरपुडे, प्रदीप परदेशी यांच्या अर्जावर हरकती घेतल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चारही अर्ज अवैध ठरविले. त्यावर त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. त्यावर आज निकाल होऊन न्यायालयाने भाजपच्या तीन उमेदवारांचे वैध ठरविले. सुरेश खरपुडे यांचा अर्ज बाद ठरला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. योगेश चिपाडे यांचा अर्ज वैध ठरला आहे.
न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. विरोधकांनी कितीही कूट नीतीचे राजकारण केले, तरी शेवटी विजय सत्याचाच होतो. आता न्यायालयातील लढाई जिंकली आहे. पुढील काळात जनतेच्या न्यायालयातील लढाई लढून आम्ही ती नक्की जिंकू. विरोधकांच्या खालच्या पातळीच्या राजकारणला जनतेने थारा देऊ नये, अशी प्रतिक्रिया सुवेंद्र गांधी यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.