Hasan Mushrif Guardian Minister : ...अखेर हसन मुश्रीफांची स्वप्नपूर्ती; पालकमंत्रिपदी पुनर्वसन तर चंद्रकांतदादा विस्थापित !

Kolhapur Politics : युती सरकारमुळे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना विस्थापित व्हावे लागले आहे.
Hasan Mushrif
Hasan Mushrif Sarkarnama
Published on
Updated on

राहुल गडकर -

Kolhapur News : मागील अठरा वर्षांपासून मंत्री, पाच वेळा आमदार, कार्यकर्त्यांची मोठी फळी, प्रशासनावर पकड असूनही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना वारंवार पालकमंत्रिपदाने हुलकावणी दिली होती. अखेर हसन मुश्रीफ यांची युती सरकारमध्ये स्वप्नपूर्ती झाली आहे. मुश्रीफ यांची पालकमंत्रिपदावर वर्णी लागल्याने जिल्ह्यातील समीकरण बदलल्याची चिन्हे आहेत.

एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुश्रीफ यांचे पुनर्वसन केले असले तरी युती सरकारमुळे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना विस्थापित व्हावे लागले आहे. कोल्हापूर- व्हाया पुणे त्यांची सोलापूर आणि अमरावती जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावर वर्णी लागली आहे. त्यामुळे पाटील यांचा प्रवास दिवसेंदिवस कोल्हापूरपासून लांब होत चालला आहे. (Latest Marathi News)

Hasan Mushrif
NCP Crisis News : शरद पवार गटाची खेळी; 'राष्ट्रवादी कुणाची' सुनावणीत निवडणूक आयोगालाच पकडणार कोंडीत?

2009 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाल्यापासून हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळणार अशी चर्चा होती. त्याबाबतची इच्छा त्यांनी पक्षश्रेष्ठी यांच्याकडे बोलून दाखवली होती. मात्र, ऐनवेळी तत्कालीन काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले. त्यावेळीदेखील मुश्रीफ यांच्या आशेवर पाणी फिरले. मुश्रीफ यांना त्यावेळी कामगारमंत्री पद देण्यात आले.

राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यापासून मुश्रीफ हे कागल विधानसभा आमदार राहिले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर मुश्रीफ यांना विरोधी बाकावर बसावे लागले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत युती सरकारला बहुमत असताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले.

या वेळी पालकमंत्री पदाची माळ आपल्या गळ्यात पडेल, अशी भावना मुश्रीफ यांच्या मनात होती. त्यासाठी वरिष्ठ स्तरावर त्यांनी प्रयत्न केले. मात्र, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी फासे पालटून पुन्हा पालकमंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आपल्याकडे असावे, अशी इच्छा असली तरी त्यावेळी मुश्रीफ यांना पालकमंत्री पद मिळवता आले नाही.

Hasan Mushrif
Gadchiroli News : आधीच सरकारच्या विरोधात रोष, त्यात डॉ. उसेंडींचा विरोध; भाजप आमदाराची होणार दमछाक !

जिल्ह्यात काँग्रेसच्या विधानसभा सदस्यांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन सतेज पाटील यांना पालकमंत्रिपद देण्यात आले. या वेळी मुश्रीफ यांना ग्रामविकासमंत्री सोबत त्यांना अहमदनगरचे पालकमंत्रिपद देण्यात आले. पालकमंत्रिपदावरून सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात छुपे युद्ध पाहायला मिळत होते. एक प्रकारे मुश्रीफ यांनी जिल्ह्याचे पालकत्व घेत स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन लोकांच्या समस्या जाणून घेत होते.

दीड वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकार कोसळले. सात महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतील अजित पवार गट ही सत्तेत सहभागी झाला. सहभागी होणाऱ्या पहिल्या सात आमदारांमध्ये मुश्रीफ यांचाही सहभाग होता. मुश्रीफ सत्तेत सहभागी झाल्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्रिपद घेण्यास सज्ज होते. तशी फिल्डिंगही लावली होती. त्याचबरोबर कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची वर्णी करावी, यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढला होता.

अशावेळी दोघांच्या वादात तिसऱ्याचा फायदा झाला. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदावर वर्णी लागली. त्यावेळीही मुश्रीफ यांना पालकमंत्रिपदापासून दूर राहावे लागले. त्यावेळी मुश्रीफ वारंवार जनता दरबारमध्ये आपणच जिल्ह्याचे पालकत्व घेणार , असे जनतेला सांगत होते, तर दुसरीकडे भाजपचे चंद्रकांत पाटील यांना पुन्हा कोल्हापूरचे पालकमंत्रिपद द्यावे, यासाठी मोठी यंत्रणा कामाला लागली होती; पण खोळंबलेला पालकमंत्री पदांचा विस्तार आज पार पडला. या विस्तारात मंत्री मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्रिपद देण्यात आले.

Hasan Mushrif
Guardian Minister Districts : अजितदादा पुण्याचे कारभारी तर चंद्रकांतदादांकडे सोलापूर; 12 जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर !

तब्बल 18 वर्षांनी हसन मुश्रीफ यांची स्वप्नपूर्ती झाली. एकीकडे हे चित्र असताना भाजपच्या गोटात मात्र नाराजीचा सूर उमटत आहे. उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुन्हा कोल्हापूरमध्ये पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. ते प्रयत्न फसले आहेत. कार्यकर्त्यांना पाटील हे पालकमंत्री होतील अशी आशा होती; पण मुश्रीफ यांना पालकमंत्रिपद मिळाल्याने भाजपचा भ्रमनिरास झाला आहे.

दरम्यान, मुश्रीफ यांना पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात वेगळी समीकरणं जुळणार आहेत. विशेष करून मुश्रीफ यांचे होमपीच असणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघात भाजपचे समरजीत सिंह घाटगे यांची अडचण होणार आहे.

पुन्हा एकदा मुश्रीफ यांचे पुनर्वसन करून घाटगे यांना कोंडीत पकडण्याचा डाव खुद्द अजित पवार गटाने केला आहे, तर विशेष कार्यकारी अधिकारी निवड, हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीवरील निवड पहिल्यापासूनच वादात आहे. काही जणांना निधी मिळत नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्या येण्याने जिल्हा नियोजन समितीवरील निवड पुन्हा होण्याची शक्यता आहे.

Hasan Mushrif
Pune Crime News : हिंजवडीतील कोट्यवधी रुपयांच्या मेडिकल प्रवेश फसवणुकीचं 'पुणे कनेक्शन'; अॅडमिशनची बोगसगिरीही उघड

हसन मुश्रीफ यांच्या पालकमंत्रिपदावरून कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक वेगळी उभारी मिळालेली आहे. पूर्वीचे पालकमंत्री दीपक केसरकर हे शिंदे गटाचे असल्याने त्यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप काही जणांकडून करण्यात आला होता. मात्र, मुश्रीफ पालकमंत्री झाल्याने राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गट, राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा नवा वाद कोल्हापूर जिल्ह्यातून समोर येण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसचे सतेज पाटील यांना फायद्याचे ठरणार आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com