Gadchiroli News : आधीच सरकारच्या विरोधात रोष, त्यात डॉ. उसेंडींचा विरोध; भाजप आमदाराची होणार दमछाक !

MLA Dr. Holi : ‘नऊ वर्ष विकासाचे, जनकल्याणाचे, प्रगतीचे’ असे पत्रक तयार केले.
Dr. Devrao Holi and Dr. Namdev Usendi
Dr. Devrao Holi and Dr. Namdev UsendiSarkarnama
Published on
Updated on

Gadchiroli District Political News : राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. विधानसभा निवडणुकांनाही फारसा काळ उरला नाही. अशात सारेच पक्ष आता आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी जिवाचे रान करत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातही आता आजी व माजी आमदार आमनेसामने उभे ठाकले आहेत. (Prepared a leaflet titled 'Nine Years of Development, Public Welfare, Progress')

श्रेयवादावरून दोघांत चांगलीच जुंपली असून जिल्ह्यातील राजकारणात या वादाची चांगलीच चर्चा होत आहे. भाजपचे डॉ. देवराव होळी हे सलग दुस-यांदा गडचिरोली विधानसभेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. नऊ वर्षांच्या काळात आपण कोणकोणती विकासकाम केली. गडचिरोली विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी काय केलं, याचा लेखाजेाथा मांडण्यासाठी त्यांनी ‘नऊ वर्ष विकासाचे, जनकल्याणाचे, प्रगतीचे’ असे पत्रक तयार केले.

हे पत्रक सध्या विधानसभेतील गावागावांत वाटले जात आहेत. या पत्रकात चंद्रपूर येथील एसटीचे विभागीय कार्यालय हे आपल्या पाठपुराव्यामुळे गडचिरोलीत आले. अन् त्याचा जनतेला मोठा फायदा झाला, याचा उल्लेख आहे. नेमका हाच मुद्दा पकडून माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी आता आमदार होळींना धारेवर धरले आहे. उसेंडी आमदार असताना त्यांच्या प्रयत्नाने गडचिरोलीत एसटीचे विभागीय कार्यालय मंजूर झाले होते.

असे असताना होळी हे आपण केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत. जनतेला फसविण्याची ही भूमिका आहे, असे म्हणत आमदार डॉ. देवराव होळी यांना जनतेला फसविण्याचे काम बंद करावे, असा इशारा दिला. आपण गडचिरोली विधानसभा क्षेत्रात विविध कामे केली, अनेक कामांना मंजुरी मिळवून दिली. डॉ. होळी मात्र त्या कामांचे लोकार्पण करून श्रेय घेत असल्याचे डॉ. नामदेव उसेंडी यांनी सांगितले.

दरम्यान, आपण गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली. गडचिरोली येथे आपल्याच पुढाकारातून व प्रयत्नांतून एसटीचे विभागीय कार्यालय आणले. आपण केलेल्या कामांचा लेखाजोगा जनतेसमोर मांडत आहोत. डॉ. उसेंडी हे केवळ आरोप करण्याचे काम करतात असे डॉ. होळी म्हणाले. गडचिरोलीत सध्या सरकारच्या विरोधात प्रचंड संताप दिसून येत आहे. विविध विषयांसाठी हजारोंच्या संख्येने तरूणाई रस्त्यावर उतरली होती.

चक्का जाम करून त्यांनी तब्बल अडीच तास वाहतूक रोखून धरली होती.आमदार डॉ. होळी यांच्या एका ऑडिओ क्लिपने तर संतापाची लाट पसरली होती. तुझ्या एकाच्या मताने निवडून आलो का, असे होळी म्हणाले होते. हा मुद्दा चांगलाच पेटला असताना त्यांनी विधानसभा मतदारसंघात विकासनिधी नको, अशी मागणी करीत रोष ओढवून घेतला होता.आता होळींनी एक पत्रक काढून विकासकामांचा लेखाजोगा मांडला. पण डॉ. उसेंडींनी यातील बहुतांश कामे आपण केली असल्याचे सांगून होळींच्या दाव्यांची पुरती पोलखोल करून टाकली.

Dr. Devrao Holi and Dr. Namdev Usendi
Gadchiroli Naxalite News : विध्वंसाचा मार्ग सोडून ‘या’ माओवादी जोडप्याने धरली विकासाची वाट !

माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी हे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे यावेळेस कुठल्याही स्थितीत गडचिरोली विधानसभा क्षेत्र काबीज करण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. पत्रकबाजीच्या मुद्यावरून आजी-माजी आमदार आमनेसामने आले असून राजकीय वर्तुळात या श्रेयवादाची चर्चा रंगली आहे.

Edited By : Atul Mehere

Dr. Devrao Holi and Dr. Namdev Usendi
Gadchiroli Forest Martyr News : वन शहिदाच्या कुटुंबाला होणार ५० लाखांची मदत, हा निर्णय घेणारे महाराष्ट्र पहिले राज्य !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com