अब्दुल कलामांना नावे ठेवणाऱ्या नरसिंहानंद यांच्याविरुद्ध FIR चा आदेश

नरसिंहानंद सरस्वतीवर कार्यवाही करण्याचे आदेश अहमदनगरच्या प्रथमवर्ग न्यायाधीश टी. एम. निराळे यांनी तोफखाना पोलिसांना दिला आहेत.
Yati Narsinhanand Saraswati
Yati Narsinhanand SaraswatiSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - उत्तरप्रदेशच्या गाजियाबाद येथील डासना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद सरस्वती याच्याविरोधात फौजदारी प्रक्रियेच्या 156 (3) नुसार कार्यवाही करण्याचे आदेश अहमदनगरच्या प्रथमवर्ग न्यायाधीश टी. एम. निराळे यांनी तोफखाना पोलिसांना दिला आहेत. ( FIR order against Narasimhanand naming Abdul Kalam )

महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते बहिरनाथ वाकळे, आर्किटेक्‍ट अर्शद शेख, कामगार नेते अनंत लोखंडे न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. ऍड. असिम सरोदे यांनी न्यायालयामध्ये तक्रारदारांतर्फे बाजू मांडली. यती नरसिंहानंद सरस्वती याने फेब्रुवारी 2021 मध्ये अलिगढ (उत्तर प्रदेश) येथे आयोजित मेळाव्यात देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्‍तव्य केले होते. देशाच्या एकात्मतेस व मानवतेस धोका निर्माण करणारी जातीयवादी विधाने केली होती.

Yati Narsinhanand Saraswati
विजय औटी यांच्या राजकीय कारकिर्दीला लंकेंकडून कायमचा ब्रेक?

यु-ट्युबवर हा व्हीडीओ पहिल्यानंतर अहमदनगरच्या जागरूक नागरिक महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते बहिरनाथ वाकळे, आर्किटेक्‍ट अर्शद शेख, कामगार नेते अनंत लोखंडे यांनी यती नरसिंहनंद सरस्वती याच्या विरोधात तक्रार दाखल केली. अहमदनगर पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे अहमदनगर येथील न्यायालयात जुलै 2021 मध्ये खासगी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता.

ज्येष्ठ विधिज्ञ सरोदे यांना ऍड. मदन कुऱ्हे, ऍड. अजित देशपांडे, ऍड. अक्षय देसाई, ऍड. तृणाल टोणपे, ऍड. सुनयना मुंडे, ऍड. फारुख बिलाल शेख, ऍड. इरफान शेख व ऍड. साकिब शेख यांनी सहकार्य केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com