विजय औटी यांच्या राजकीय कारकिर्दीला लंकेंकडून कायमचा ब्रेक?

शिवसेनेचे ( Shivsena ) विजय औटी ( Vijay Auti ) यांच्या राजकारणाला ब्रेक लागल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
Vijay Auti Vs Nilesh Lanke
Vijay Auti Vs Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - पारनेर नगर पंचायत निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी ही निवडणूक चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. पारनेर तालुक्यातील राजकारणात ही निवडणूक क्लायमॅक्स असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे ( Shivsena ) विजय औटी ( Vijay Auti ) यांच्या राजकारणाला ब्रेक लागल्याचे बोलले जाऊ लागले आहे. Supreme Court grants relief to Vandana Murkute

सुमारे सहा वर्षांपू्र्वी पारनेर ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रुपांतर झालं. या निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यावेळी पारनेर तालुक्यात शिवसेनेची चलती होती. विजय औटी आमदार होते. शिवाय नीलेश लंके शिवसेनेचे तालुका प्रमुख होते. विधानसभा निवडणुकी पूर्वी आमदार नीलेश लंके त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे शिवसेनेची ताकद कमी होऊ लागली. राष्ट्रवादीकडून नीलेश लंके आमदार झाले. लंके यांनी शिवसेनेचे जुने साधीदार हळूहळू राष्ट्रवादीत आणत राहिले. ही प्रक्रिया पारनेर नगर पंचायत निवडणुकीपर्यंत अविरत सुरू होती.

Vijay Auti Vs Nilesh Lanke
कोण म्हणतं मी राजकारणातून बाजूला गेलो : विजय औटी

या उलट विजय औटींनी जनसंपर्क कमी झाला. अभ्यासू असलेले विजय औटी पुस्तके व त्यांचे शेती विषय प्रयोग यात जास्त वेळ देऊ लागले. शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळविण्याचे प्रयोग करतानाच औटींचा शाश्वत मतदार लंके हळूहळू आपल्या जवळ वळवत राहिले. यातच पारनेर नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला. तत्पूर्वी नीलेश लंके यांनी पिंपळनेर येथील धार्मिक कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यातील काही मंत्र्यांना बोलावून वातावरण निर्मिती केली. औटी यांनीही राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना बोलावत मोठी सभा घेतली.

Vijay Auti Vs Nilesh Lanke
तुम्ही काय गमावले आहे, याचा शोध तुम्हीच लावा : विजय औटी

विजय औटी यांच्या पत्नी जयश्री औटी यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्या विरोधात केवळ एकच उमेदवार राहिल व सरळ लढत होईल याची दक्षता नीलेश लंके यांनी घेतली. लंके यांच्याकडून औटींवर नाव न घेता आरोप व्हायचे मात्र विजय औटी यांनी आरोपांना उत्तर दिले नाही. शिवसेनेचा प्रचार शांतेत तर राष्ट्रवादीचा प्रचार आक्रमक होता. जयश्री औटी या पंचायत समितीच्या पहिल्या महिला सभापती होत्या. त्यांच्या कार्यकाळात पारनेर नगर पंचायतीत मोठी सुधारणा झाली. मात्र लंके यांच्या प्रचारतंत्रा समोर जयश्री औटी यांचा अनुभवी व अभ्यासू चेहरा मतदारांना फिका वाटला. अवघ्या 13 मतांनी औटींना पराभव पहावा लागला. हा पराभव एका अर्थाने विजय औटींचा पराभव मानला जाऊ लागला आहे.

एक वेळ पारनेर तालुका हा अभ्यासू लोकांचा व डाव्या विचारसरणीचा तालुका समजला जायचा. मात्र काळा बरोबर मतदारांची वैचारिक बैठक आणि त्यानुसार राजकारणही बदलत असल्याची पावती या निवडणुकीने दिली आहे.

Vijay Auti Vs Nilesh Lanke
मी 50 हजारांनी आमदार होणार, बिनधास्त रहा : विजय औटी 

आगामी निवडणुकीत हीच स्थिती राहणार का?

ही निवडणूक केवळ पारनेर शहराची होती. आमदार नीलेश लंके यांच्या बालेकिल्ल्या जवळची होती. मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, विविध कार्यकारी सोसायटी, दूध संघ आदींच्या निवडणुका याच वर्षात होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत राजकीय समीकरणे वेगळी राहणार का की आमदार नीलेश लंके प्रस्थापितांना धक्के देत नव्या चेहऱ्यांना राजकारणात स्थिर करण्यात यश मिळविणार हे याच वर्षात कळणार आहे. त्या दृष्टीने ही निवडणूक नांदी ठरण्याची शक्यता आहे. आमदार नीलेश लंके यांचे वादळ रोखण्याचे मोठे आव्हान सध्या विजय औटी व सुजित झावरे यांच्या समोर आहे. पारनेर नगर पंचायतच्या पराभवाचे शल्य दूर सारत औटी पारनेरचे फिनिक्स ठरणार का की पारनेरचे राजकारण बदलाचे वारे वाहणार हे आता लवकरच कळणार आहे.

Vijay Auti Vs Nilesh Lanke
हजारे यांच्या राळेगणसिद्धीत 9 विरुद्ध 0 ने औटी-मापारी पॅनल विजयी

विजय औटी यांची कारकिर्द

विजय औटी हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दोन वेळचे आमदार भास्करराव औटी यांचे चिरंजिव आहेत. त्यांनी कॉलेज जीवनात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले. त्यांचे व्यक्तिमत्त्वावर कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव आहे. अहमदनगर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू लॉ कॉलेजमध्ये त्यांनी आठ वर्षे ऑफिस सुप्रिटेंडेंट म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ समाजकारण व राजकारण केले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते जिल्हा परिषद सदस्य होते. 2004मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत विधानसभेची निवडणूक लढविली आणि आमदार झाले. सलग 15 वर्षे ते पारनेरचे आमदार होते. त्यांचे मोठे बंधू डॉ. विद्याधर औटी हे अर्थशास्राचे प्राध्यापक होते. त्यांनी पारनेर व अहमदनगर येथील न्यू आर्टस महाविद्यालयात प्राचार्य म्हणून सेवा केली. विजय औटी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांनी पहिल्याच वर्षी तालुक्यातील रस्ते सुधारण्यासचे काम केले. त्यामुळे तालुक्यात दळणवळण वाढले. तालुक्यात एमआयडीसीही आली.

आमदार म्हटल की त्यांच्या भोवती निष्कारण कार्यकर्त्यांचा गराडा हे सर्वसाधारण चित्र विजय औटींच्या बाबतीत खोटं ठरतं. ते आमदार असताना त्यांच्या बरोबर कार्यकर्त्यांपेक्षा फाईलीच जास्त असायच्या असे काही जाणकार सांगतात. विधानसभेच्या वाचनालयात वाचन करून अभ्यासपूर्ण भाषण करून विधानसभा गाजविणारे ते आमदार होते. त्यांच्या अभ्यासामुळे शासकीय अधिकाऱ्यांनाही त्यांचा आदरयुक्त दरारा असतो. सध्या ते पारनेर तालुक्यातील त्यांच्या शेतीत जिरेनियम उत्पादनाचा प्रयोग करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com