Ahemadnagar News : सोनईत प्रशांत गडाखांवर वीज चोरीचा गुन्हा दाखल

Maharashtra Politics : नगरमधील राजकीय क्षेत्रात खळबळ
Prashant Patil Gadakh
Prashant Patil GadakhSarkarnama

विनायक दरंदले

Prashant Gadakh : दहा वर्षांपूर्वी घडलेल्या नेवासे तालुका दुध संघाच्या वीजचोरी प्रकरणी प्रशांत पाटील गडाख (Prashant Patil Gadakh) यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सन २०१२ ते २०१५ मधील संचालक व समितीवरील सदस्यांचा समावेश आहे.

सोनई (अहमदनगर) पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीड वर्षांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या गडाखांवरची कारवाई ही माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर राजकीय सूड घेण्यासाठीच झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

महावितरणचे वसई (पालघर)चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय सुदर्शन सिंह यांनी २३ फेब्रुवारी २०२३ रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात वीजचोरीची फिर्याद दिली होती. ती फिर्याद सोनई पोलीस ठाण्यात वर्ग झाली आहे. त्याद्वारे प्रशांत गडाख त्यांचे चुलतभाऊ प्रवीण गडाख, अध्यक्ष गणपत चव्हाण व अन्य सोळा जणांवर गुन्हा दाखल केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सांगितले.

Prashant Patil Gadakh
By Election News : "Who is Dhangekar? कसबा तो झाकी है..."; पुण्यात आता फ्लेक्सची चर्चा

राज्यात घडलेल्या राजकीय भूकंपानंतर आमदार गडाख यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याच पाठिशी राहण्याच्या निर्धार नेवाशात केला होता. त्यानंतर जुन्या वीजचोरीचे प्रकरण उकरुन आमदार गडाखांचे पंख छाटण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.

यापूर्वी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाखांच्या समोर असलेले कट्टर विरोधक संभाजीराव फाटके, दादा पाटील शेळके, शिवाजी कर्डिले व तुकाराम गडाखांनी कधीच खालच्या पातळीवर राजकारण केले नाही. आताचे विरोधक मात्र खालच्या दर्जाचे राजकारण करीत आहेत. हजारो कामगारांचा संसार उभा असलेल्या सहकारी संस्था व शैक्षणिक संस्था मोडण्याचे डाव खेळत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Prashant Patil Gadakh
Sanjay Raut : हक्कभंग समिती राऊतांची चौकशी करेल; पण कारवाईचे अधिकार विधिमंडळाला आहेत का?

या प्रकरणी आमदार शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) म्हणाले की, "राजकीय अस्तित्व व वैयक्तिक जीवन उध्वस्थ करुन खच्चीकरण करण्यासाठी तालुक्यातील विरोधक सध्या अनेक डाव टाकत आहेत. दहा वर्षांपूर्वीच्या वीजचोरीचा गुन्हा आता दाखल झाला, यातच सर्व काही आले. न्यायदेवतेवर आपला पूर्ण विश्वास असून तालुक्यात मेळावा घेऊन वस्तुस्थिती मांडली जाईल."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com