Kasba By Election Results: "Who is Dhangekar? कसबा तो झाकी है..."; पुण्यात आता फ्लेक्सची चर्चा

Pune By Election News : कवितेनंतर फ्लेक्सच्या माध्यमातून भाजपला डिवचलं
Dhangekar Flex in Pune
Dhangekar Flex in PuneSarkarnama

Pune by-poll election : कसब्यात आमदार मुक्ता टिळक तर चिंचवडमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली. ही निवडणूक भाजपसह व महाविकास आघाडीकडून कधी नव्हे इतकी प्रतिष्ठेची करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी दोन्ही गटाचे दिग्गज नेतेमंडळींनी प्रचारात सहभाग घेतला होता. त्यामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

प्रचाराच्या रणधुमाळीत तापलेले वातावरण मतदानानंतरही शांत होण्याचे नाव घेताना दिसत नाही. दरम्यान, कसब्यात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन्ही उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात आले. भाजपने (BJP) पैसे वाटल्याचे आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आले. मारहाणीच्याही घटना कसब्यात घडल्या. त्यानंतर निकाल लागण्यापूर्वीच आमदार म्हणून भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasane) आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचे फ्लेक्सही लागले होते.

Flex in Pune
Flex in PuneSarkarnama

विविध कारणांनी कसब्याची पोटनिवडणून राज्यात गाजली आहे. त्यामुळे येथील निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आता या निवडणुकीचा निकाल उद्या (ता. २) लागणार आहे. तत्पुर्वीच कसब्यात एक कविता व्हायरल करण्यात आली आहे. त्या कवितेच्या माध्यमातून काँग्रेसने भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. या कवितेतून प्रचारादरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विचारलेल्या एका खोचक प्रश्नाचे मार्मिकपणे उत्तर देण्यात आले आहेत.

Dhangekar Flex in Pune
Sanjay Raut : हक्कभंग समिती राऊतांची चौकशी करेल; पण कारवाईचे अधिकार विधिमंडळाला आहेत का?

भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कसबा पोटनिवडणुकीचा प्रचारादरम्यान भरसभेत व्हू इज धंगेकर? (Who is Dhangekar?) असा प्रश्न विचारला होता. यातून त्यांनी महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न केला होता.

त्या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसने कवितेच्या माध्यमातून दिले आहे. कवितेचे शिर्षकही "व्हू ईज धंगेकर?" असेच आहे. प्रत्येक ओळीत प्रश्न आणि त्याचे थेट भाजपला उत्तर अशा स्वरूपाची ती कविता आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे

Dhangekar Flex in Pune
Devendra Fadnavis : मोठी बातमी! फडणवीसांविरोधात धंगेकरांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; काय आहे प्रकरण?

या कवितेनंतर कसब्यात आता व्हू इज धंगेकर? (Who is Dhangekar?) या अशायाचे फ्लेक्सही झळकले आहेत. निकालाच्या पूर्वसंध्येला धंगेकरांच्या समर्थनार्थ हे फ्लेक्स लावण्यात आले आहे. त्यात "Who is Dhangekar? कसबा तो झाकी है, कोथरूड अभी बाकी है" अशा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या फ्लेक्साच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपला डिवचलं आहे. हे फ्लेक्स राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शहरात लावण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com