अहमदनगर : अहमदनगर शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगात घटत आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा रुग्णालयात नवीन तयार केलेल्या कोविड विभागाचे अतिदक्षता विभागात रूपांतर करण्यात आले होते. या अतिदक्षता विभागाला आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास शॉकसर्किटमुळे अचानक आग लागली. त्यामुळे दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून मिळत आहे. Fire breaks out in intensive care unit of Ahmednagar district hospital: Ten patients die
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच जिल्हा शल्यचिकित्सकांच्याही वाहनाला अचानक आग लागली होती. या बाबत चौकशी सुरू असतानाच आज जिल्हा रुग्णालयातील नवीन अतिदक्षता विभागाला आग लागली. या विभागाचे फायर ऑडिट झालेले नव्हते. आग व धुराचे लोट दिसल्यावर कर्मचारी व प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. घटना माहिती होताच महापालिकेचे अग्निशमन विभागाचे पथक घटना स्थळी दाखल झाले. मात्र आग वेगात पसरली. तसेच धुराचे लोटही उठले. अतिदक्षता विभागात अत्यावस्थ अवस्थेत असलेल्या 10 रुग्णांचा यात मृत्यू झाला. ऐन भाऊबिजेच्या दिवशीच ही घटना घडल्याने रुग्णांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटना स्थळाला जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अगरवाल, तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकुमार देशमुख आदींनी भेट दिली. रुग्णालय परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.