शासकीय ठेकेदारावर गोळीबार : पुणे जिल्ह्यातील दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मांडओहळ धरण रस्त्यावर आज (मंगळवारी) भरदिवसा शासकीय ठेकेदारावर गोळीबार करण्यात आला.
Crime
Crime Sarkarnama
Published on
Updated on

Crime News : पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरण रस्त्यावर आज (मंगळवारी) भरदिवसा शासकीय ठेकेदारावर गोळीबार करण्यात आला. स्वप्नील आग्रे (वय 25, रा. म्हसोबा झाप) असे जखमीचे नाव असून, त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ग्रामसुरक्षा दलाने दोन आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत अधिक माहिती अशी ः नगर-कल्याण महामार्गावर कर्जुलेहर्या ते मांडओहळ धरण रस्त्यावर म्हसोबा झाप येथील शासकीय ठेकेदार स्वप्नील आग्रे (वय २५) हे त्यांच्या चार चाकी वाहनातून जात असताना दुपारी अडीच वाजता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात दोन गोळ्या आग्रे यांच्या छातीच्या उजव्या बाजूला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. गोळीबारानंतर हल्लेखोर तेथून पळून गेले. दरम्यान, आग्रे यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. काही तरुणांनी शंभर क्रमांकावर फोन करून या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

Crime
पारनेर तालुक्यात शिंदे गट झाला सक्रिय : शिवसेनेसह राष्ट्रवादीलाही धक्का?

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील ग्रामसुरक्षा दलाला मोबाईलवर मेसेज केला. ग्रामसुरक्षा दलातील तरुणांनी पाठलाग करून हल्लेखोरांचे वाहन पोखरी परिसरात रोखले. हल्लेखोरांच्या हातात दोन गावठी पिस्तुले होती. ग्रामसुरक्षा दलातली तरुणांनी या हल्लोखोरांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. शक्ती नारायण राय, नितीश गुड्डू (दोघेही हल्ली रा. राजुरी, जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. अन्य दोघे जण पसार झाले आहेत.

मागील दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक शासकीय कामे आग्रे त्यांनी घेतली होती. त्यामुळे आर्थिक देवाण-घेवाणीतून हा हल्ला झाला आहे काय, यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनखाली सुरू आहे.

Crime
video : Anna Hazare पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

हल्ला झाल्यानंतर शंभर क्रमांकवर याबाबतची माहिती समजली. त्यानंतर तत्काळ पोलिस यंत्रणेमार्फत घटना परिसरातील पोखरी, वाऱ्हाणवाडी येथील ग्रामसुरक्षा यंत्रणेतील तरुणांसह ग्रामस्थांना याबाबत वाहन व संबंधित घटनेची माहिती कळवली गेली. पुढील काही वेळात हल्लेखोर पकडले गेले. त्यामुळे मोठ्या संख्येत ग्रामस्थांनी आपले संपर्क क्रमांक ग्रामसुरक्षा दलाला द्यावेत.

- घनश्‍याम बळप, पोलिस निरीक्षक, पारनेर पोलिस ठाणे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com