पारनेर तालुक्यात शिंदे गट झाला सक्रिय : शिवसेनेसह राष्ट्रवादीलाही धक्का?

पारनेर तालुक्यातील शिवसेनेतही ( Shivsena ) दोन गट पडले आहेत.
Shivsena
Shivsena Sarkarnama

Shivsena Vs Shinde : राज्यात शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची राज्यातील सत्ता गेली. पारनेर तालुक्यातील शिवसेनेतही ( Shivsena ) दोन गट पडले आहेत. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचाही एक पदाधिकारी शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा आहे.

शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानणारी पारनेर तालुक्यातील शिवसेना आता फुटीच्या मार्गावर आहे. शिवसेनेचे प्रमुख दोन पदाधिकारी ,एक नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक पदाधिकारी यांच्यासह पाच ते सहाशिवसेना कार्यकर्ते शिंदे यांच्या शिवसेना गटात लवकरच सामील होणार असल्याने तालुक्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

Shivsena
पुरूषोत्तम जाधव झाले शिंदे गट शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख...

राज्यातील शिवसेनेत फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने भारतीय जनता पक्षा बरोबर आघाडी करत सरकार स्थापन केले. इतकेच नव्हे तर ते मुख्यमंत्री सुद्धा झाले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे माजी आमदार व विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.

औटी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात शिवसेना कार्यकर्त्यांसह औटी यांनी आम्ही मूळ शिवसेनेत च राहणार असल्याचे जाहीर केले. आम्ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहोत व यापुढेही राहणार अशी जाहीर घोषणा केली. इतकेच नव्हे तर यावेळी औटी यांनी कार्यकर्त्यांचा ठाकरे यांच्यासोबत दूरध्वनीवरून थेट संवादही घडून आणला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देत आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगितले.या वेळी आम्ही मूळ शिवसेनेत राहणार असल्याची ग्वाही दिली.

Shivsena
Shivsena Bhavan| शिंदे गट प्रतिशिवसेना भवन उभारणार? अखेर उदय सामंतांनीच सांगितलं...

या जाहीर मेळाव्यात पारनेर तालुक्यातील शिवसेना एक संघपणे ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले होते. मात्र या गोष्टीला काही दिवस उलटत नाहीत तोच शिवसेनेतील तीन ते चार प्रमुख पदाधिकारी यांच्यासह राष्ट्रवादीचा एक माजी पदाधिकारी शिंदे गटात सामील होण्याच्या तयारीत आहेत.

यासाठी संबंधितांनी शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची वेळही घेतली होती. मात्र काही कारणास्तव त्यांची भेट लांबीवर पडली आहे. मात्र शिवसेनेतील या फुटींमुळे तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालत होणार आहे. मात्र अद्याप तरी ही शिवसेनेतील फुट जोपर्यंत या कार्यकर्त्यांचा शिंदे गटांमध्ये प्रवेश होत नाही तोपर्यंत केवळ ही राजकीय चर्चा ठरणार आहे.

पारनेर तालुक्यातील राजकारणात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे पक्षांतर तसेच गट बदलण्याच्या प्रक्रियेला मात्र या निमित्ताने सुरवात होत आहे. यापुढील काळातही या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातही फुट पडण्याचे शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com