काँग्रेस, भाजपचं कुणीही जिंकलं तरी कोल्हापुरात नगरसेवकच बनणार आमदार!

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.
BJP and Congress
BJP and Congress Sarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या (Kolhapur North Vidhansabha Constituency) पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेसकडून (Congress) जयश्री जाधव यांची उमेदवारी निश्‍चित आहे, तर भाजपने (BJP) सत्यजित कदम यांना मैदानात उतरवले आहे. या दोन उमेदवारांतच मुख्य लढत असून, या दोघांतील कोणाचाही विजय झाला तरी महापालिकेचा पहिला नगरसेवक आमदार (MLA) होणार आहे.

जुन्या कोल्हापूर शहर व आताच्या ‘उत्तर’ मतदारसंघातून आतापर्यंत एकही नगरसेवक आमदार म्हणून निवडून गेलेला नाही. माजी महापौर ॲड. महादेवराव आडगुळे व आर. के. पोवार यांनी १९९९ च्या विधानसभा एकमेकांविरोधात लढले होते. आडगुळे काँग्रेसचे, तर पोवार राष्ट्रवादीचे उमेदवार होते आणि दोघांनाही पराभव पत्करावा लागला होता. या दोघांचा अपवाद वगळता नगरसेवक किंवा महापौरांनी उत्तरमधून विधानसभा निवडणूक लढवलेली नाही. काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव या २०१५ मध्ये भाजपच्या नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या. भाजपचे उमेदवार सत्यजित कदम हे ताराराणी आघाडीचे माजी नगरसेवक आहेत. पूर्वी एकदा कदम काँग्रेसच्या चिन्हावर महापालिकेत निवडून आले होते.

BJP and Congress
महाविकास आघाडीला नितेश राणे म्हणाले, वाह, खरंच करुन दाखवलं!

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिवंगत माजी आमदार जाधव यांनीच काँग्रेसची उमेदवारी मिळवली. त्यामुळे त्यांच्या पत्नी जाधव याच पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रबळ दावेदार ठरल्या आहेत. या मतदारसंघात या दोनच उमेदवारांत प्रमुख लढत असणार आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोणीही विजयी झाले तर त्यांच्या रूपाने महापालिकेचा पहिला नगरसेवक विधानसभेत आमदार म्हणून जाणार एवढे निश्‍चित झाले आहे.

BJP and Congress
महाविकास आघाडी सरकारकडून दरेकरांना मिळालं बक्षीस! खुद्द त्यांनीच दिली कबुली

ही निवडणूक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील (Satej Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिष्ठेची केली आहे. काँग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यांच्या उमेदवारीवर महाविकास आघाडीतील सगळ्याच घटक पक्षांनी शिक्कामोर्तब केल्याने बंटी पाटलांनी अर्धी लढाई जिंकली आहे. कोल्हापूर उत्तरची निवडणूक लढवण्याची इच्छा स्थानिक शिवसैनिकांनी व्यक्त केली होती. पण शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांना पाठिंबा द्यायचे ठरविले आहे. यामुळे जयश्री जाधव या आता महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील. त्यांच्या उमेदवारीची काँग्रेसकडून आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्या शिवसेनेसह महाविकास आघाडीचा एकत्रित मेळावा आयोजित करण्याचे नियोजन केले जात आहे. उत्तर मतदारसंघातून शिवसेनेकडून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळावी, असा आग्रह स्थानिक शिवसैनिकांनी धरला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com