महाविकास आघाडीला नितेश राणे म्हणाले, वाह, खरंच करुन दाखवलं!
मुंबई : राज्यात शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि कॉंग्रेसच्या (Congress) नेतृत्त्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले . तेव्हापासून भाजपकडून सातत्याने सरकार पाडण्याचे मनसुबे आखले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात नवी सत्तासमीकरणे जुळ्याची चर्चा सुरु झाली आहे. एआयएमआयएचे खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला (NCP) ऑफर दिली आहे. यावर भाजपचे आमदार नितेश राणेंनी खोचक टीका
राज्यात एमआयएमचा एक खासदार, २९ नगरसेवक आणि दोन आमदार आहेत. एमआयएमने भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी ही ऑफर दिल्याचे चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना यावर भाष्य केले होते. काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत शरद पवार यांनीदेखील भाजपाला हरवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं, असा नारा दिला होता. त्याच भूमिकेवर भाष्य करत इम्तियाज जलील यांनी एमआयएमच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे.
यावरून भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाविकास आघाडीवर टीका करण्याची संधी सोडली नाही. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, वाह.. AIMIM ची महाविकास आघाडी मध्ये येण्याची तयारी.. कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे.. आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे.. खरंच, करून दाखवलं!!
भाजपा आमच्यामुळे जिंकते असे आरोप आमच्यावर करण्यात येतात. त्यामुळे जर हे संपवायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत युती करणार का, असा मी त्यांना विचारलं, त्यांना फक्त मुस्लिमांची मतं हवी आहेत. आम्ही कुणालाही नको आहोत. मग कशाला राष्ट्रवादी? काँग्रेस स्वत:ला धर्मनिरपेक्ष मानतात त्यांनाही मुस्लीम मतं हवी आहेत. तर मग यावं काँग्रेसनं, आपण युती करु. त्यावर ते अजून काही बोलले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटायला आले असता मी त्यांना एमआयएम कडून युतीची ऑफर दिली. आता त्यांनी फक्त आरोप करायचे की त्यांना त्यांची भूमिका सिद्ध करायची हे बघायचं आहे, असं इम्तियाज जलील म्हणाले.
आज सर्वात जास्त देशाच नुकसान कोणी करत असेल तर ती भाजपा आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी, सत्तेतून दूर ठेवण्यासाठी जे काही लागतं, ते आम्ही करायला तयार आहोत. आम्ही उत्तर प्रदेशातही समाजवादी पार्टी, बसपासोबत याबाबत बोलणी केली होती पण त्यांनाही मुस्लिमांची मते हवीत, पण एमआयएम पक्ष नको, म्हणून मी आज राष्ट्रवादी, कॉंग्रेसला ही ऑफर दिली आहे, असे सांगत जलील यांनी एमआयएमच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.