शिर्डीत ओढे-नाल्यावरील अतिक्रमणामुळे जलप्रलय : साईभक्तांसह नागरिकांचे हाल

परवा (ता. 31) रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे साईबाबांच्या शिर्डीचा पुरती दैना उडाली.
Flood in Shirdi
Flood in ShirdiSarkarnama

Shirdi : लोक म्हणतात, धनदांडगे ओढे नाले खातात... ओढे नाले ही काय खायची गोष्ट आहे... तरीही लोक म्हणतात, काहीही खाऊ शकतात जगातले धनदांडगे. साईंच्या शिर्डीत त्यांनी ओढे नालेच खाल्ले. परवा (बुधवारी ) रात्री कोसळला धो धो पाऊस, काल ( गुरुवारी ) उडाला हाःहाकार साईंच्या शिर्डीत...

परवा (ता. 31) रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे साईबाबांच्या शिर्डीचा पुरती दैना उडाली. पाणी वाहून नेणारे नैसर्गिक प्रवाह पक्की बांधकामे करून अडविण्यात आले. त्यामुळे पश्चिमेकडील गावांतून आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने शहरात अक्षरशः हाहाकार माजविला. साईसंस्थानच्या दोनशे खाटांच्या रुग्णालयात पाणी शिरल्याने तेथील अतिदक्षता विभागासह अन्य रुग्ण अन्यत्र हलविण्याची वेळ आली. लक्ष्मीनगर, आंबेडकरनगरसह सखल भागातील उपनगरांतील रहिवाशांच्या घरांत पाणी शिरले. वीज उपकेंद्र, साईसंस्थानचे प्रसादालय, पोलीस ठाणे आणि विश्रामगृहाभोवती पाण्याचा वेढा पडला.

Flood in Shirdi
Dr. Sujay Vikhe Patil : नगर-शिर्डी महामार्गासाठी सुजय विखेंचे गडकरींना साकडे

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासकीय यंत्रणेला मदतकार्य करण्याच्या सूचना दिल्या. आज (ता. दोन) खासदार डॉ. सुजय विखे पाटील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. नगरपरिषेदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे हे फौजफाट्यासह पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याचा प्रयत्न करीत होते. माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते, मंगेश त्रिभुवन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लक्ष्मीनगर येथील रहिवाशांना मध्यरात्रीनंतर सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली.

काल रात्री शिर्डीत शंभर मिलिमीटर, तर राहाता शहरात एकशे बारा मिलिमीटर पावसाची नोंद झाली. काकडी, कोऱ्हाळे, कालेवाडी, नांदुर्खी आणि कनकुरी परिसरात कोसळलेल्या पावसाचे पाणी वेगाने शिर्डी शहरात आले. मात्र, तेथील शिवाच्या ओढ्यासह अन्य नैसर्गिक प्रवाहावांवर पक्की बांधकामे करण्यात आल्याने, जागा मिळेल तेथे पाणी शिरले. सखल भागातील उपनगरे अक्षरशः पाण्याखाली गेली. वीज उपकेंद्रात पाणीच पाणी झाल्याने शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. तळमजल्यात पाणी शिरल्याने साईसंस्थानला दोनशे खाटांचे रुग्णालय आणि त्यासमोरील द्वारकामाई धर्मशाळा वीजपुरवठा खंडित झाल्याने बंद ठेवण्याची वेळ आली.

Flood in Shirdi
शिर्डीत फूल विक्रेते चिडले : सुरक्षारक्षकांशी भिडले

शहराभोवतालच्या शेतांत पावसाचे पाणी शिरून शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. या दोन्ही शहरांभोवतालच्या सखल भागातील शेकडो एकरांत पावसाचे पाणी साठले आहे. राहाता शहरातील शिवाजी चौकातील नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलात दर वर्षीप्रमाणे यंदा सलग दोन वेळा पाणी शिरल्याने तेथील व्यापा-यांचे मोठे नुकसान झाले. विमानतळाच्या आणि साईसंस्थान रुग्णालयाच्या भिंतीला पाण्याच्या लोंढ्यामुळे भगदाड पडले. भाविकांच्या वाहनांत पाणी शिरल्याने त्यांना मोठे नुकसान सहन करण्याची वेळ आली. शिर्डीतील प्रमुख रस्त्यांवरून नदीसारखे पाणी वाहू लागले.

Flood in Shirdi
बंगळुरूचे 178 साईभक्त अडकले शिर्डी विमानतळावर

शिर्डीतील परिस्थिती आपण महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कानी घातली. ही परिस्थिती पुन्हा उद्‍भवू नये, यासाठी उद्या खासदार डॉ. विखे पाटील वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेणार आहेत. शिवाचा ओढा मोकळा करावा लागणार आहे.

- अभय शेळके, माजी उपनगराध्यक्ष

पाण्याचे नैसर्गिक प्रवाह मोकळे न केल्याने शिर्डी आणि परिसराचे फार मोठे नुकसान झाले आहे. याबाबत उपाययोजना केली नाही, तर भविष्यात दर वर्षी असे नुकसान अटळ आहे.

- डॉ. एकनाथ गोंदकर, विश्वस्त, साईसंस्थान

शिवाच्या ओढ्यावर अतिक्रमण झाल्याने असा हाहाकार उडाला. यासाठी साईसंस्थान व नगरपरिषदेने खास बाब म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

- रमेश गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com