Satara News : मोदी सरकारमुळेच नौदलाच्या ध्वजावर 'शिवमुद्रा'.

Navy Day Celebration : भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम ; छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून निर्णय.
Dhairyashil Kadam
Dhairyashil KadamSarkarnama
Published on
Updated on

Satara News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेवून नौदल्याच्या ध्वजावर 'शिवमुद्रा' घेतली. तसेच नौसैनिकांच्या खांद्यावरील बॅचमध्ये बदल करून त्या ठिकाणी त्याच आकाराचे नवीन बॅच लावण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. यातून त्यांनी राष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवल्याचे भाजपाचे सातारचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सांगितले.

कदम म्हणाले, ‘नौसेना दिनाच्या’ निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावर मोदी Modi यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले आणि त्यांच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल भावना व्यक्त केल्या. गेल्यावर्षी मोदी सरकारने नौसेनेच्या झेंड्यावर महाराजांची शिवमुद्रा लावली होती. यावर्षीच्या नौसेना दिवसाच्या निमित्ताने आता नौसेनेच्या प्रत्येक सैनिकाच्या गणवेशावर ही मुद्रा असणार आहे.

Dhairyashil Kadam
Jalgaon District Bank News : अजितदादा गट जिल्हा बँक अध्यक्षांचा मोठा निर्णय; व्याजदर बंद करणार...

या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या असून अभिमानाच्या आहेत. स्वतंत्र भारताच्या इतिहासात गेली सत्तर वर्षे सशस्त्र सेनांचे दिवस दिल्लीतील लॉनवर साजरे होत होते. प्रथमच पंतप्रधान नौसेना दिवस साजरा करण्यासाठी सिंधुदर्गावर आले होते. मध्ययुगाच्या पूर्ण गुलामगिरीच्या इतिहासात एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होते ज्यांनी आरमाराचे महत्त्व ओळखले होते.

ज्याच्याकडे आरमार त्यांची समुद्रावर सत्ता, त्या राज्याचे समुद्रकिनारे बळकट आणि अंतिमतः जगाच्या व्यापाराचे दरवाजे त्या राज्याचे खुले होतात. असा सर्व विचार करून महाराजांनी स्वतःचे आरमार उभे केले. या अर्थाने शिवाजी महाराज हे आधुनिक भारताच्या नौसेनेचे जनक ठरतात. हे महत्व ओळखून नौसेनेच्या ध्वजावर महाराजांच्या मुद्रेवरून प्रेरणा घेऊन नवीन मुद्रा लावण्यात आली होती.

आता नौसेनेच्या प्रत्येक सैनिकाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा असणार आहे. आधुनिक भारताच्या नौसेनेचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करणारे मोदी सरकार हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातले पहिले सरकार आहे. तसेच आधुनिक भारताची नौसेना या कोकणाच्या भूमीत, या महाराष्ट्राच्या भूमीत निर्माण झाली, याची जाणीव ठेवून मोदीजींनी या भूमीलाही वंदन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्याच प्रमाणे कालच्या नौसेनेच्या प्रात्यक्षिकांमध्ये एका युद्धनौकेचे नेतृत्व एका महिलेच्या हातात ठेवून. मोदी सरकारने महिला सक्षमीकरणासाठी आणखी एक पाऊल उचले आहे. जितक्या गोष्टी केल्या आहेत तितक्या गेल्या सत्तर वर्षात कोणी केल्या नसतील. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पासून प्रेरणा घेवून काम करत असल्याबद्दल मोदी सरकारचे जिल्हा भाजप Bjpकडून आभार व अभिनंदन केले जात आहे.

Edited By : Amol Sutar

Dhairyashil Kadam
Shivsena Politics : शिवसेनेची आघाडी; नोंदवले तीस हजार शिक्षक मतदार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com