Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी 'मनपा'तील इच्छुक सरसावले, भावांनी थाटले कॅम्प

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Kolhapur Politics : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी महानगरपालिका निवडणुकीत इच्छुक असणाऱ्या भावाने आपापल्या प्रभागात कॅम्प आयोजित करून वातावरण निर्मिती सुरू ठेवली आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
Mukhyamantri Majhi Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 21 July : आगामी महानगरपालिका निवडणुकीत बहिणींची मर्जी राखण्यासाठी प्रभागातील भावाने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी महानगरपालिका निवडणुकीत इच्छुक असणाऱ्या भावाने आपापल्या प्रभागात कॅम्प आयोजित करून वातावरण निर्मिती सुरू ठेवली आहे.

लाडक्या बहिणींचा मताचा गट्टा मिळवण्यासाठी भावांची धडपड सुरू झाली असून ग्राउंड लेव्हलपर्यंत कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रासाठी बहिणीला इकडून तिकडून हेलपाटे मरायला लागू नये, याची खबरदारी घेत सर्वच सुविधा एका मांडवाखाली उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे बहिणीचा आशीर्वाद येणाऱ्या निवडणुकीत मिळावा यासाठी भावांचे अथक प्रयत्न सुरू आहेत.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) या योजनेचा तळागाळातील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून प्रभागात साहेब असणारा भाऊ आता लाडक्या बहिणीसाठी पुढाकार घेत आहे. सर्वसामान्य महिलांना अर्ज करताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी ऑनलाइन अर्जापासून ते नवीन बँक खाते काढण्यापर्यंत सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी प्रभागातील साहेबांनी कंबर कसली आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
Prakash Abitkar On KP Patil : 'ज्येष्ठत्वाचा आदर राखून गप्प आहे, व्यक्तिदोषातून झपाटल्यासारखे...'; आबिटकरांनी सुनावले

महानगरपालिका निवडणुकीत (Election) आपल्या साहेबांच्या मागे बहीणींनी उभे राहावे यासाठी भावाची धडपड सुरू आहे. सध्या पात्र महिलांना अर्ज ऑनलाईन (Online) अपलोड करण्यासाठी यंत्रणा आवश्‍यक आहे. पण, त्यासाठी ऑफलाईन अर्ज भरून घेतले जात आहेत. ही बाब लक्षात येताच अनेकजणांनी पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हालचाली सुरू केल्या आहेत. आपापल्या प्रभागातील महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिल्यास त्याचा फायदा आपल्याला पालिकेच्या तसेच विधानसभेच्या निवडणुकीतही होईल हा विचार केला जात आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
Sharad Pawar Vs Ajit Pawar : बारामतीवरून शरद पवारांचा प्रश्न, अजितदादांनीही दिलं उत्तर; पुण्यातील बैठकीत काय झालं?

काँग्रेस इच्छुकांचा अप्रचार?

तळागाळातील महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रभागातील सर्वच पक्षातील इच्छुक सक्रिय झाले आहेत. महायुतीतील (Mahayuti) पक्षांकडून सर्व यंत्रणा इच्छुकांपर्यंत पोहोचत आहे. शिवाय प्रभागातील महाविकास आघाडीतील इच्छुक देखील आपापल्या परीने प्रभागातील महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी पाठपुरावा करत आहेत.

मात्र, काही घटकांकडून महाविकास आघाडीतील इच्छुकांबाबत अपप्रचार केला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला आणि महापालिका निवडणुकीत अर्ज कुजून सत्ताधाऱ्यांच्या उलट प्रचार करण्याची रणनीती आखली जाण्याची भीती काही महायुतीतील कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे अधिकृत घटकांकडेच अर्ज करा, असं आव्हान ही काही लोकांकडून करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com