Prakash Abitkar On KP Patil : 'ज्येष्ठत्वाचा आदर राखून गप्प आहे, व्यक्तिदोषातून झपाटल्यासारखे...'; आबिटकरांनी सुनावले

Kolhapur Political News : 'जनतेने मला पहिली संधी दिली तेव्हा विधानसभा गाजवली. निधीसाठी सत्ताधाऱ्यांशी संघर्ष केला. मतदारसंघाला भरीव निधी मिळावा म्हणून मंत्र्यांना अंगावर घेतले आणि निधी खेचून आणला...'
Prakash Abitkar, K P Patil
Prakash Abitkar, K P PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : दोन वर्षात 4 वेळा पक्ष बदलणारे के.पी.पाटीलसाहेब तुम्ही आम्हाला गद्दार म्हणाला, 50 खोके, एकदम ओके म्हणाला, यापेक्षा कहर म्हणजे खालच्या पातळीवरची भाषा वापरून मला 'गाडतो' ची भाषा करू लागलात हे तुम्हाला शोभते का? तुमच्या राजकीय ज्येष्ठत्वाचा आदर, मान राखून गप्प आहे. तरीही तुम्ही माझ्यावर वैयक्तिक चिखलफेक करीत आहात? तुम्ही मूळ विषय सोडून मानसिक संतुलन बिघडल्यासारखे का बोलत आहात? असा सवाल करत आमदार प्रकाश आबिटकर यांनी काँग्रेसच्या के.पी.पाटलांना सुनावले.

शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी माजी आमदार के. पी पाटील यांनी केलेल्या आरोपाचे खंडण करताना सुनावले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी 'बिद्री' चा विषय आहे ना मग 'बिद्री' सोडून व्यक्तिदोषातून झपाटल्यासारखे अपप्रचार का करत आहात? असा हल्लाबोल केला.

यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, बिद्री कारखाना कधीही बंद पडणार नाही हे तुम्हाला पक्के माहित आहे. मग ज्या कागदपत्राची पूर्तता तुम्ही करायची ते सोडून विनाकारण माझ्या नावाने चार तालुक्यांमध्ये शंखध्वनी करीत राजकारण करीत बसलाय याचं मला नवल वाटते. 'बिद्री' शिवाय तुमचं राजकीय पानच हालत नाही. म्हणून तुम्ही डांगोरा पिटायला चालू केलाय.

आजपर्यंत अनेक कार्यकर्त्यांना संचालक करतो, पोरांना नोकऱ्या लावतो असे आश्वासन देत राजकारण करीत आलात. ते कार्यकर्ते आणि चिठ्ठीवर काम करणारी पोरं म्हातारी झाली. अजून त्यांचा किती छळ करणार आहात? असा सवाल आबिटकर यांनी केला.

Prakash Abitkar, K P Patil
Supriya Sule Vs Sunil Shelke : सुप्रिया सुळे अन् सुनील शेळके यांच्यात खडाजंगी; काय आहे कारण?

आमदार आबिटकर म्हणाले, जनतेने मला पहिली संधी दिली तेव्हा विधानसभा गाजवली. निधीसाठी सत्ताधाऱ्यांशी संघर्ष केला. मतदारसंघाला भरीव निधी मिळावा म्हणून मंत्र्यांना अंगावर घेतले आणि निधी खेचून आणला. यातूनच 'मुख्यमंत्री ग्रामसडक योजना' यांसह अनेक योजना, कायदे, निर्णय झाले. यामुळे मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी आणला.

ज्या कामांचा तुम्ही आजतगायत विचार केला नव्हता असे प्रश्न मी मार्गी लावले. याचा तुम्ही चांगलाच धसका घेतलाय. तुम्हाला काही विषय मिळेनात म्हणून 'बिद्री' ची टिमकी आणि आमची वैयक्तिक बदनामी करून काय पिकतंय का बघू लागलाय, असा घणाघात आमदार आबिटकर यांनी केला.

तुमचीही शिक्षण संस्था आहे, सूतगिरणी आहे, तिथे काय चालते, त्यासाठी कशा जमिनी मिळविल्या मी कधी काय बोललो का? साहेब ही फक्त सुरुवात आहे. जर मीही एकदा तोंड उघडून तुमच्या घरी महिन्याला कोठून किती-किती कमिशन, टक्केवारी येती ते सांगू का? तुम्ही आमदारकीच्या (MLA) काळात कोण ठेकेदार नेमले, किती कमिशन घेतले हे जगजाहीर केले तर तुमची पळता भुई थोडी होईल. तुम्ही वेळ आणलीच तर खरंच एकदा जनतेला समदं कळू द्या. तुमच्या गोड बोलण्याला भुलायचे दिवस संपले. आता जनतेला 'रिझल्ट' लागतो, असेही आबिटकर म्हणाले.

Prakash Abitkar, K P Patil
Shivsena UBT : छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा आता एकच नेता? शिवसंकल्प मोहिमेपासून चंद्रकांत खैरे हात राखून

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com