Solapur Dcc Bank Election : सोलापूर डीसीसी बॅंक निवडणुकीत मोठा ट्विस्ट : माजी संचालकांचा प्लॅन बी तयार; भाजपची डोकेदुखी वाढणार

Former director News : सोलापूर जिल्हा बँकेच्या माजी संचालकांनी कलम 88 कारवाईला स्थगितीसाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. तोडगा न निघाल्यास प्लॅन बी अंतर्गत सात तालुक्यांतील नेते चार तालुक्यांतील नेत्यांपासून वेगळी भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Solapur Dcc Bank Election
Solapur Dcc Bank ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 27 October : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालकांपुढे निवडणूक लढविण्यामध्ये सर्वांत मोठा अडथळा सहकार कायदा कलम ८८ च्या कारवाईचा आहे. या कारवाईला स्थगिती मिळावी, यासाठी माजी संचालकांनी मुख्यमंत्र्यांच्या दारी धाव घेतली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावर काय तोडगा काढतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, या माजी संचालकांनी प्लॅन-बी देखील तयार केल्याची माहिती आहे, त्यानुसार जिल्ह्यातील सात तालुक्यांतील माजी संचालक वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे, तसा निर्णय झाल्यास सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यांतील नेतेमंडळी एका बाजूला तर चार तालुक्यांतील नेतेमंडळी दुसऱ्या बाजूला राहण्याची चिन्हे आहेत.

माजी संचालकांच्या विरोधातील कलम ८८ च्या कारवाईचा अडथळा दूर करण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ते आज मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. मुख्यमंत्र्यांकडूनही तोडगा न निघाल्यास बँकेच्या निवडणुकीसाठी काही माजी संचालकांनी प्लॅन-बी देखील तयार केला असल्याचे समजते. या निवडणुकीत करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला, दक्षिण सोलापूर व मंगळवेढा या सात तालुक्यातील नेते एकत्रित येण्याचीही चर्चा व शक्यता आहे.

प्लॅन-बी यशस्वी झाल्यास या सात तालुक्यातील नेते एका बाजूला तर अक्कलकोट, बार्शी, मोहोळ व उत्तर सोलापूर या चार तालुक्यांतील नेते एका बाजूला राहण्याची शक्यता आहे. बँकेच्या निवडणुकीत कोणाच्या सोबत कोण आहे? आणि कोणाच्या विरोधात कोण आहे? याचे चित्र १७ नोव्हेंबरला (अर्ज माघारीचा शेवटचा दिवस) स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत ‘मी तुमचाच’ हा फॉर्म्युला वापरला जाण्याची दाट शक्यता आहे.

Solapur Dcc Bank Election
Nagpur Graduates constituency : विधानपरिषद निवडणूक निकालात नागपूरमध्ये भाजपला धक्का : पोस्टल मतमोजणीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी आघाडीवर

जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला, दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढा या सात तालुक्यातील नेते एका बाजूला झाल्यास मतांची बेरजेतही लक्षणीय फरक दिसून येत आहे. या सात तालुक्यांत सोसायटी गटातील एकूण १२४३ मतांपैकी ८३३ मते या माजी संचालकांच्या गटाकडे आहेत. याशिवाय पणन प्रक्रिया मतदारसंघातील ६९ मते, दुग्ध संस्था मतदारसंघात ४९५, तर बॅंका, पतसंस्था व इतर संस्था गटात ३२९ मतदान या सात तालुक्यांकडे आहेत. म्हणजेच एकूण २५९६ मतांपैकी तब्बल १७२६ मते आहेत.

उर्वरीत अक्कलकोट, बार्शी, मोहोळ व उत्तर सोलापूर या चार तालुक्यांकडे एकूण २५९६ मतांपैकी ८७० मते आहेत. त्यामुळे माजी संचालकांकडे दुर्लक्ष करणेही सत्ताधारी भाजपला परवडणारे नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याची प्रतीक्षा माजी संचालकांना आहे.

Solapur Dcc Bank Election
Solapur DCC Bank Election : मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सोलापूर DCC बॅंकेचे माजी संचालक मुंबईत डेरेदाखल; कलम 88 च्या कारवाईचा अडथळा दूर होणार?

विधी क्षेत्राचेही लक्ष

सोलापूर बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवारपर्यंत (ता. ३०) मुदत आहे. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी सोमवारी (ता. २ नोव्हेंबर) होणार आहे. राज्याच्या सहकाराला भविष्यात अनेक उपयुक्त संदर्भ देणारी ही प्रक्रिया ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रक्रियेकडे नेत्यांसह सहकारात काम करणाऱ्या वकिलांचेही लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com