Nagpur Graduates constituency : विधानपरिषद निवडणूक निकालात नागपूरमध्ये भाजपला धक्का : पोस्टल मतमोजणीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी आघाडीवर

postal vote counting : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीतील पहिल्या टप्प्यात काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजीत वंजारी टपाली मतांमध्ये 15 मतांनी आघाडीवर आहेत. फडणवीस आणि गडकरींच्या गृहजिल्ह्यातील या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे विशेष लक्ष लागले आहे.
abhijeet wanjari-sudhakar kohale
abhijeet wanjari-sudhakar kohaleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nagpur, 27 October : विधान परिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघाच्या निकालाकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा गृहजिल्हा असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून कोण बाजी मारणार याकडे विशेष लक्ष असणार आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात पोस्टल मतांची मोजणी झाली असून यामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार अभिजीत वंजारी हे १५ मतांनी आघाडीवर आहेत.

राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांसासाठी ता. २३ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत एकूण पाच जागांसाठी 182 उमेदवार आपले नशीब अजामावत आहेत. पण खरी लढत ही महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यात होत आहे. काही ठिकाणी बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांनीही चुरस निर्माण केली आहे, त्यामुळे काही ठिकाणी धक्कादायक निकालाची शक्यता नाकारता येत नाही.

पुणे शिक्षक आणि पदवीधर, अमरावती शिक्षक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे पदवीधर मतदारसंघात लढत होत आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीपासून महायुतीने एकहाती निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी त्याला छेद देण्याचे काम केले आहे, त्यामुळे विधान परिषदेच्या पाच जागांच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

abhijeet wanjari-sudhakar kohale
Solapur DCC Bank Election : मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सोलापूर DCC बॅंकेचे माजी संचालक मुंबईत डेरेदाखल; कलम 88 च्या कारवाईचा अडथळा दूर होणार?

नागपूरमध्ये भाजपने यावेळी नवा चेहरा असलेले सुधाकर कोहळे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाने विद्यमान आमदार अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. भाजपश्रेष्ठींना या मतदारसंघातील बंडखोरी रोखण्यात यश आले आहे. त्यानुसार भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले यांनी कोहळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, त्यांचे नाव मतपत्रिकेवर असल्याने त्याचा फटका कोहळे यांना बसणार का, याची उत्सुकता आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीतही बंडखोरी झाली आहे. सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेले नीतेश कराळे मास्तर हेही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे कराळे मास्तरांच्या बंडखोरीचा फटका कोणाला बसतो, याकडेही लक्ष असणार आहे.

abhijeet wanjari-sudhakar kohale
Pune MLC Election News: "2004 पूर्वीची जुनी पेन्शन लागू करा नाहीतर..."; शिक्षक मतपेटीत मतदारानं टाकली चिठ्ठी; उमेदवारांना दिला इशारा

दरम्यान, नागपूर पदवीधर मतदारसंघात पहिल्या टप्प्यात पोस्ट मतांची मोजणी झाली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात 204 पोस्टल मते झाली आहेत. त्यातील भाजपचे सुधाकर कोहळे यांना 86, तर काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना 101 मते पडली आहेत. इतरांना 22 मते पडली आहेत, त्यामुळे पोस्टलमध्ये काँग्रेसचे वंजारी हे आघाडीवर आहेत.

नागपूर पदवीधर मतदारसंघात एकूण १ लाख ६५ हजार ९५५ मते आहेत. यामध्ये जिंकण्यासाठी 82 हजार ९५५ मतांचा कोटा आहे. पहिली पसंतीची 82 हजार ९५५ मते एकाही उमेदवाराला मिळाली नाही तर दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात, त्यात पहिल्यांदा कोटा पूर्ण करणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com