Dudhani Bazar Samiti Result: म्हेत्रेंचा अभेद्य गड ढासळला : दुधनीत भाजपच्या कल्याणशेट्टींची बाजी; म्हेत्रे कुटुंबातील दोघांचा धक्कादायक पराभव

Dudhani APMC Result: दुधनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार कल्याणशेट्टी यांना माजी आमदार व सहकार क्षेत्रातील बलाढ्य व्यक्तिमत्व सिद्रामप्पा पाटील यांनी पाठिंबा दिला होता.
Dudhani bazar samiti Election Result
Dudhani bazar samiti Election ResultSarkarnama

अक्कलकोट : संपूर्ण सोलापूर (Solapur) जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) निवडणुकीत काँग्रेसचे माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) यांच्या पॅनेलचा भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी (sachin kalyanshetti) यांच्या पॅनेलने धक्कादायक पराभव केला. होमपिचवर बलाढ्य असलेल्या व गेल्या अनेक वर्षांपासून बाजार समितीच्या सत्तेत असलेल्या म्हेत्रे कुटुंबीयांचा अभेद्य गड अखेर ढासळला, त्यावर आता भाजपचा झेंडा फडकला. (Former minister Siddharam Mhetre's panel defeated in Dudhani bazar samiti)

बाजार समितीच्या निवडणूक लागलेल्या १६ जागांपैकी १२ जागेवर आमदार कल्याणशेट्टी यांना, तर ४ जागेवर म्हेत्रे गटाला विजय मिळाला आहे. यात माजी मंत्री म्हेत्रे यांचे बंधू आणि अक्कलकोट काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर म्हेत्रेंचा पराभव म्हेत्रे परिवाराच्या जिव्हारी लागणारा आहे. अठरांपैकी व्यापारी मतदारसंघातील दोन जागा म्हेत्रे गटाच्या बिनविरोध झाल्या होत्या. आमदार कल्याणशेट्टी यांच्या व्यूहरचनेमुळे माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या व राजकीय अस्तित्वाच्या बनलेल्या या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.

Dudhani bazar samiti Election Result
Majalgaon APMC Election Result: आमदार सोळंकेंनी महाविकास आघाडीच्या यादीत आणखी माजलगाव बाजार समिती टाकली; पुत्र वीरेंद्र यांचीही एन्ट्री

दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची जय्यत तयारी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आधीपासून केलेली होती. निवडणूक कालावधीत आरोप प्रत्यारोपाच्या फंदात न पडता अतिशय शांतपणे त्यांनी आपली यंत्रणा राबविली. दुसऱ्या फळीतील नेते आरोप-प्रत्यारोप करीत होते. आमदार कल्याणशेट्टी व माजी राज्यमंत्री म्हेत्रे यांनी थेट एकमेकांवर टीका केली नाही. अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जात असलेल्या सोसायटी व ग्रामपंचायत मतदार संघातील मतदारांना त्यांनी पर्यटनाला घेऊन जाऊन निवडणुकीच्या लढाईत आघाडी घेतली होती.

बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार कल्याणशेट्टी यांच्या पाठीशी राहणे पसंत केले आहे. याचा आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीवर प्रभाव पडणार आहे. ही म्हेत्रे बंधूंच्या दृष्टीने राजकीय धोक्याची घंटा असू शकते. या अटीतटीच्या बनलेल्या दुधनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार कल्याणशेट्टी यांना माजी आमदार व सहकार क्षेत्रातील बलाढ्य व्यक्तिमत्व सिद्रामप्पा पाटील यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे आमदार कल्याणशेट्टी यांच्या गोटात उत्साह संचारला होता.

Dudhani bazar samiti Election Result
Jamkhed Bazar Samiti: राम शिंदे-रोहित पवारांमध्ये पुन्हा काँटे की टक्कर; कर्जतप्रमाणेच जामखेडलाही मिळाल्या समसमान जागा..

माजी राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचे बंधू काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे व दुधनी बाजार समितीचे माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे यांचा सोसायटी मतदारसंघातून निसटता पराभव झाला. सोसायटी मतदारसंघातील सर्वच्यासर्व अकरा जागांवर आमदार कल्याणशेट्टी यांनी विजय मिळविला.

विजयी व पराभूत उमेदवारांना पडलेली मते : श्री शांतलिंगेश्वर शेतकरी विकास पॅनेल (काँग्रेस)

सहकारी संस्था सर्वसाधारण : कालिबत्ते चंद्रकांत गुरण्णा (१८१), ढंगापुरे अशोक मल्लप्पा (१७७), प्रचंडे सतीश गुरूसिद्धप्पा (१७९), बणजगोळ काशिनाथ शरणप्पा (१८०),

म्हेत्रे शंकर सातलिंगप्पा (१७७), यळमेली महादेव कल्लप्पा (१७२), हौदे राजेंद्र रामचंद्र (१७४).

सहकारी संस्था महिला : दुर्गी मल्लम्मा नागप्पा (१८६), पाटील विजयालक्ष्मी गुरुशांतप्पा (१७६).

सहकारी संस्था इतर मागासवर्गीय : म्हेत्रे प्रथमेश शंकरराव (१८५)

सहकारी संस्था विमुक्त भटक्या जमाती : जानकर महेश बाबूराव (१७८)

ग्रामपंचायत सर्वसाधारण :पाटील रमेश रेवणसिद्ध (१७०, विजयी), पुजारी सिद्दण्णा शिवप्पा (१६८),

अनुसूचित जाती जमाती : दसाडे ईरण्णा अंदप्पा (१२३, विजयी),

आथिर्कदृष्ट्या दुर्बल घटक- पाटील शिवानंद बाबुराव (१२१, विजयी)

हमाल व तोलार-कोळी बाबू गणपती (१४५, विजयी)

Dudhani bazar samiti Election Result
Sangola Bazar Samiti Results : सांगोल्यात देशमुखांच्या सहमतीच्या राजकारणाला पसंती; बाजार समितीवर सर्वपक्षीय पॅनल !

श्री सिद्धरामेश्वर शेतकरी परिवर्तन पॅनल (भाजप)

सहकारी संस्था सर्वसाधारण : कोगनूर विश्वनाथ निंगप्पा-२०१ (विजयी), झळकी मल्लिकार्जुन मडोळप्पा- २०१(विजयी) नागुर विश्वनाथ तुक्कप्पा-२०२(विजयी), परमशेट्टी सातलिंगप्पा सैदप्पा -२००(विजयी), बाके सिद्धाराम अण्णप्पा-२०४(विजयी), बिराजदार देवेंद्र सिद्राम -२०५(विजयी), राठोड मोतीराम शिवू-२०१(विजयी).

सहकारी संस्था महिला : मचाले सुवर्णा सुधीर-२०३(विजयी), सालेगांव अश्विनी विजयकुमार-२०३(विजयी).

सहकारी संस्था इतर मागासवर्गीय-शेख वहिदपाशा इब्राहीम-२०१(विजयी).

सहकारी संस्था विमुक्त भटक्या जमाती -पुजारी निंगप्पा सिद्राम -२०८ (विजयी).

ग्रामपंचायत सर्वसाधारण-तोळनुरे सिध्दाराम नीलकंठ -१७१ (विजयी), बिराजदार मल्लिनाथ बसवंत -१६६

अनुसूचित जाती जमाती-इटेनवरू विश्वनाथ विठ्ठल-११४

आथिर्क दृष्ट्या दुर्बल घटक -बिराजदार लक्ष्मीपुत्र रामेश्वर ११४

हमाल व तोलार-मानकर सैदप्पा गुरण्णा ६६ मते.

भाजप प्रणित सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलचे 12 उमेदवार विजयी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com