Shahajibapu Politic's : शहाजीबापूंनी उट्टे काढले; माजी आमदार दीपक साळुंखेंच्या मुलाचा होमपिचवर पराभव

Zilla Parishad Election Result : सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांचे पुत्र सूर्यादित्य साळुंखे यांचा जवळा गटात १५५४ मतांनी पराभव झाला असून राष्ट्रवादीचे अतुल पवार विजयी झाले आहेत.
deepak salunkhe-shahajibapu patil
deepak salunkhe-shahajibapu patilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 09 February : सोलापूर जिल्हा परिषदेच्या निकालात अनेक तालुक्यात धक्कादायक निकाल लागले आहेत. सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांचे चिरंजीव सूर्यादित्य साळुंखे यांचा हक्काच्या जवळा मतदारसंघात तब्बल १५५४ मतांनी पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अतुल पवार यांनी साळुंखे यांना चारीमुंड्या चितपट केले. जवळा गटात दीपक साळुंखेंच्या मुलाचा पराभव करत शहाजीबापूंनी विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीतील खेळीचे उट्टे काढल्याचे मानले जात आहे.

सांगोला तालुक्यात आतापर्यंत जाहीर झालेल्या चार गटांपैकी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने दोन जागा मिळविल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसने एक, तर शेतकरी कामगार पक्षाने एक जागा जिंकली आहे. आणखी तीन गटाची मतमोजणी बाकी आहे.

पंचायत समितीचे आठ गणाचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक साळुंखे यांच्या आघाडीने पाच गण जिंकले आहेत, तर शिवसेना-भाजप युतीने पाच गण जिंकले आहेत. सर्वांधिक चुरस ही जावळा मतदारसंघात दिसून आली आहे. या ठिकाणी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे.

विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीत माजी आमदार शहाजी पाटील आणि दीपक साळुंखे हे आमने सामने आले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत साळुंखे यांनी घेतलेली मते पाहता दोघांच्या मतविभागाचा फायदा डॉ. बाबासाहेब देशमुख यांना झाला होता. त्यानंतर नगरपालिका निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांना वगळून सांगोल्यात सर्वपक्षीय आघाडी झाली होती. त्याचा राग शहाजीबापू पाटील यांना होता.

जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची महायुती झाली होती. त्या महायुतीमध्ये जवळा गटाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती. त्या ठिकाणी दीपक साळुंखे यांचे चिरंजीव सूर्यादित्य यांच्या पराभवासाठी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी संपूर्ण ताकद लावली होती. त्यात त्यांना यश आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com