Karmala Politics : आपल्या सोयीने करमाळ्यात येणाऱ्या संजय शिंदेंना निवडणुकांमुळे गावपाराची आठवण झाली : पाटील गटाचा हल्लाबोल

जनतेसमोर जाताना ते न केलेल्या कामाचा पाढा वाचून दाखवत आहेत.
Sanjay Shinde-Narayan Patil
Sanjay Shinde-Narayan Patil Sarkarnama
Published on
Updated on

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा (Karmala) तालुक्यातील जनतेचा तीन वर्षे कसलाही विचार न करता आपल्या सोयीने कधीतरीच तालुक्यात आलेले आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांना आगामी निवडणुकांमुळे आता गावपाराची आठवण झाली आहे. जनतेसमोर जाताना ते न केलेल्या कामाचा पाढा वाचून दाखवत आहेत, आरोप माजी आमदार नारायण पाटील (Narayan Aba Patil) गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला. (Former MLA Narayan Patil group criticized MLA Sanjay Shinde's village visit)

आमदार संजय शिंदे यांचा सध्या तालुक्यात गावभैट दौरा सुरू आहे. हा गावभेट दौरा केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काढण्यात येत आहे, असा आरोप नारायण पाटील गटाकडून केला जात आहे. या बाबत तळेकर म्हणाले की, या गावभेट दौऱ्यादरम्यान आमदार शिंदे हे त्यांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत. आतातरी त्यांनी जनतेला खरे काय ते सांगितले पाहिजे. कुकडीच्या पाण्याची आवर्तने आणण्यात आमदार अपयशी ठरले. कुकडीचे पाणी मांगी तलावात आणून तेथून एमआयडीसी मध्ये आणून उद्योगास चालना देण्याच्या घोषणेचे काय झाले?

Sanjay Shinde-Narayan Patil
Chinchwad, Kasba By-Elections : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे विधान...

तळेकर म्हणाले की, माजी आमदार नारायण पाटील यांच्या काळात कुकडीची सतरा आवर्तने करमाळा तालुक्यास मिळाली. विद्यमान आमदार महोदयांनी किती आवर्तने आणली? कुकडीची सुमारे चार हजार कोटी रुपयांची तरतूद असलेली सुप्रमा तत्कालीन मंत्री प्रा. राम शिंदे व माजी आमदार नारायण पाटील यांनी मंजूर करुन घेतली. त्यानंतर विद्यमान आमदार महोदयांनी कुकडीसाठी किती निधी उपलब्ध करून दिला?

Sanjay Shinde-Narayan Patil
Sharad Pawar : भाजप-शिंदे गटाच्या हातातून महाराष्ट्राची सत्ता जाणार : तो हवाला देत शरद पवारांचे भाकीत

नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना हा माजी आमदार नारायण पाटील यांच्या संकल्प असून याबाबत लवकरच मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आश्वासन दिले आहे. आता विद्यमान आमदार महोदयांना कुकडीचे पाणी उजनीत सोडून नंतर ते कुकडी लाभक्षेत्रात सोडण्याचे सुचणे म्हणजे स्वतः आमदार याबाबत किती गंभीरतेने पहात होते, याचे उत्तर जनतेला मिळाले, असा टोलाही शिंदे यांना लगावण्यात आला आहे.

Sanjay Shinde-Narayan Patil
Nashik Graduate Constituency : नाशिक ‘पदवीधर’बाबत भाजपचं ठरलं : 'हा' निर्णय होणार जाहीर

तळेकर म्हणाले की, करमाळा तालुक्यातील विकासकामांसाठी २०१९ नंतर किती निधी मंजूर करुन घेतला व त्यांच्या या कालावधीत किती कामे पूर्ण झाली, याचा तपशील जनतेसमोर मांडावा. सध्या तरी प्रत्यक्षात निधी आणण्यासाठी आमदार संजय शिंदे हे अयशस्वी ठरले आहेत. या गावभेट दौऱ्याचे फलित  लोकहिताचे नाही, तर येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आहे. जनतेचा व अधिकाऱ्यांचा वेळ वाया घालवण्याचा हा प्रकार असून शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी केलेली ही खटाटोप आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com