Nashik Graduate Constituency : नाशिक ‘पदवीधर’बाबत भाजपचं ठरलं : 'हा' निर्णय होणार जाहीर

आमच्या नगर जिल्ह्यातील उमेदवार आहे.
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघात (Graduate constituency) कुणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय भाजपने (BJP) घेतला आहे. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार भाजप श्रेष्ठींनी दिले असून नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आज संध्याकाळी बैठक घेऊन निर्णय जाहीर करणार आहेत, असे आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी सांगितले. (BJP has decided about Nashik Graduate constituency : This decision will be announced)

काँग्रेसची उमेदवारी डावलून डॉ. सुधीर तांबे यांच्याऐवजी सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळीच तांबे यांच्या उमेदवारीमागे भाजप असल्याची चर्चा होती. कारण, त्यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुस्तक प्रकाशनातील वाक्य होते. मात्र, भाजपने अखेरपर्यंत आपले पत्ते ओपन केले नव्हते. मात्र, स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार भाजपकडून देण्यात आले आहेत.

Satyajeet Tambe
Rajendra Raut News : भाजप समर्थक अपक्ष आमदार राऊत यांच्या संपत्तीची होणार चौकशी : हायकोर्टाचा आदेश

आमदार शिंदे म्हणाले की, डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसची उमेदवारी फेटाळली, त्यानंतर काँग्रेसकडून तांबे पिता पुत्रावर निलंबनाची कारवाई केली आहे. स्थानिक पातळीवरचा विषय आहे. आमच्या नगर जिल्ह्यातील उमेदवार आहे, त्यामुळे स्थानिक विषयावर चर्चा विनिमय करून आमचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज संध्याकाळी निर्णय घेतील. त्या निर्णयाच्या अनुंषगाने नगर जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. सह्याद्री अतिथी गृहात माझी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली आहे. आज संध्याकाळपर्यंत पाठिंब्याबाबत निर्णय होईल, असेही प्रा. राम शिंदे यांनी स्पष्ट केले.

Satyajeet Tambe
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत भाजपच्या मंत्र्याचे सकारात्मक संकेत

दरम्यान, खासदार सुजय विखे पाटील यांनीही तांबे यांना पाठिंब्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, समविचारी लोकांशी आम्ही चर्चा सुरू केली आहे. पक्षाने निर्णय नाही दिला, तर आपण स्थानिक नेत्यांनी समन्वयाने पक्षाला निर्णयाची विनंती करू शकतो का, याची चर्चा सुरू केली आहे. ज्या भागातील उमेदवार आहे, त्याला चांगला प्रतिसाद दिला जातो. जिल्ह्यातून चांगला उमेदवार असेल तर त्याला पाठिंबा दिला जातो. त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी माझ्याकडे आग्रह धरला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याला संधी मिळत असेल तर जिल्ह्यातील लोक त्यांचं सोनं करतात. त्याचपद्धतीने जिल्ह्यातील लोक प्रतिसाद देण्याचं काम करतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com