Ramesh Kadam : बाबा सिद्दीकींप्रमाणे माझ्या हत्येचा डाव ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदाराची पोलीस ठाण्यात धाव, VIDEO पाहा

Former MLA Ramesh Kadam Death threats:"माझ्या जीवितला धोका, बाबा सिद्दीकींप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव आहे", असे मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी पोलिसाना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
Ramesh Kadam
Ramesh KadamSarkarnama
Published on
Updated on

Mohol News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील माजी आमदार रमेश कदम यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आपल्या जीविताला धोका असून बाबा सिद्दीकींप्रमाणे हत्या करण्याचा डाव आहे, अशी तक्रार मोहोळचे माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांनी केली आहे.

या प्रकरणाची ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप समोर आल्यानंतर मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.कदम यांचे अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न सुरु असल्याची या क्लिपमध्ये दिसते.कदम यांना रिव्हॉल्वर लावून अपहरण करून पुण्यात नेण्याबाबत क्लिपमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. साम टिव्हीने याबाबतची बातमी दिली आहे.

Ramesh Kadam
Maharashtra Vidhan Sabha Election: अनिल देशमुखांनंतर दोन उमेदवारांवर जीवघेणा हल्ला, BJP उमेदवाराची बहीण गंभीर जखमी

"माझ्या जीवितला धोका, बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव आहे", असे मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी पोलिसाना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक केली आहे. पुण्यातील आबा काशीद नावाच्या व्यक्तीनं आपल्या अपहरणाची सुपारी दिल्याचे रमेश कदम यांनी फिर्यादीत म्हटलं आहे.

Ramesh Kadam
Maharashtra Politics: ही महाराष्ट्र धर्माची लढाई, मराठी माणसा जागा रहा, सावध रहा!

पुण्यातील आबा काशीद याने मोहोळ येथील आकाश बाबर आणि धनराज भोसले या दोन जणांना कदमांचे अपहरण करण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप आहे. आकाश बाबर आणि धनराज भोसले हे आरोपी मोहोळ पोलिसांच्या ताब्यात आहेत.

आबा काशीद यांचा शोध सुरू असल्याचे मोहोळ पोलिसांनी सांगितले. कदम यांच्या जीवितला धोका असल्याबाबतची गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी तक्रार आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com